पुणे शहर महिला तलाठीकडून महिनो – महिने अवैध गौण खनिजचा अहवाल तहसीलदारांना पाठविण्यास असर्मथा; तहसीलदार राधिका बारटक्के कारवाई करणार का?

0
Spread the love

सुयोग डेव्हलपर्सने केलेल्या अवैधरित्या गौण खनिज उत्खनन संदर्भात अजहर खान यांनी केली होती तक्रार.

ईटीएस मोजणीचा अहवाल तब्बल ६ महिन्यांनंतर वरिष्ठांकडे सादर. उशिरा अहवाल सादर करण्यामध्ये आर्थिक साटेलोटे तर नाही ना?

३ वर्षांचा कालावधी होत आला तरी फक्त कागदीच घोडे नाचत आहेत?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

तहसीलदार कार्यालयातील पुणे शहर तलाठीकडून शासनाचे दिवाळेच काढण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरातील शंकरशेठ रोड येथील सर्वे नंबर ५१३/अ/१, ५१३/ब/१, व ३६/१, ३७/१, मध्ये सुयोग डेव्हलपर्सचे बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचे अजहर खान यांच्या निदर्शनास आल्याने, खान यांनी तत्कालीन महिला तलाठी सिमा बबन गेंजगे यांना संपर्क साधला असता, सदरील सुयोग डेव्हलपर्सने गौण खनिज उत्खनन परवानगी घेतल्याचे कळविले. परंतु त्या परवानगीतील नमूद तारीख पाहिली असता दोन तीन महिन्यापूर्वीच मुदत संपल्याचे अजहर खान यांनी सिमा बबन गेंजगे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने गेंजगे यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार करण्यास सांगितले होते.

तर खान यांनी १४ डिसेंबर २०२१ रोजी लेखी तक्रार करून रात्रीचे अवैधरित्या गौण खनिज उत्खनन चालू असल्याचे लाईव्ह व्हिडिओ तहसीलदार व सिमा गेंजगे यांच्या वाटसअप नंबरला टाकले होते. त्या तारखेपासून अजहर खान यांचा पाठपुरावा सुरूच होता. सिमा बबन गेंजगे यांनी २० एप्रिल २०२२ रोजी ईटीएस मोजणी करून तब्बल ६ महिन्यानंतर ईटीएस मोजणी अहवाल सादर केला.

परंतु अहवालात सोबत फक्त ईटीएस मोजणी अहवालाची झेरॉक्स प्रत जोडलेली आहे, जागेचा पंचनामा नाही, तक्रार नमूद केलेप्रमाणे खुलासा नाही, सदर मिळकतीमध्ये गौण खनिज परवाना घेतला आहे अगर कसे, याबाबत काही उल्लेख केला नाही. सदरची मिळकत कोणाच्या नावे आहे नमूद नाही. परवानगीची मुदत संपले नंतर ही सदर ठिकाणी कामकाज सुरू आहे अगर कसे, याबाबत आपण खात्री करून अहवालामध्ये नमूद केलेले नाही. तरी पत्र मिळलेपासून २ दिवसांत समक्ष अहवाल सादर करावा. असे पत्र १० जानेवारी २०२३ रोजी तहसीलदार राधिका बारटक्के यांनी काढले होते.

परंतु त्या पत्राला तब्बल ५ महिने उलटूनही सिमा बबन गेंजगे यांनी अहवाल सादर न करता तहसीलदारांच्या पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत.सुयोग डेव्हलपर्सला पाठिशी घालून, आर्थिक हितसंबंध जपले गेलेत का? असा प्रश्न उपस्थित झाल्याने तहसिलदार राधिका बारटक्के यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी अजहर खान यांनी केली आहे. क्रमक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here