महिनाभरासाठी कोंढव्यात वाहतूकीत बदल; ज्योती हॉटेल ते शितल पेट्रोलपंप पर्यंत राहणार ऐकेरी वाहतूक

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील कोंढवा वाहतुक विभागाचे हद्दीत संत गाडगे महाराज शाळा कोंढवा खुर्द ते भैरवनाथ मंदिर कोंढवा खुर्द या दरम्यान पिण्याचे पाईपलाईनचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक शाखा पुणे शहर यांनी आदेश काढला आहे.

११ मे २०२३ ते १० जून २०२३ या कालावधीमध्ये वाहतूकीत बदल राहणार आहेत.कोंढवा वाहतूक विभाग अंतर्गत शितल पेट्रोल पंप चौकाकडून ज्योती हॉटेल चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येत आहे.

ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोलपंप अशी एकेरी वाहतूक सुरु राहिल. पर्यायी मार्ग शितल पेट्रोल पंप चौकाकडून ज्योती हॉटेल चौकाकडे जाणारी वाहतूक वेलकम हॉल जंक्शन, मेफेअर सोसायटी जंक्शनमार्गे इच्छितस्थळी जाईल.असे वाहतूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here