पुणे | रिक्षाचालक व ट्राफिक पोलिसाची भरचौकात हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक परस्परांशी भिडलेत. पिंपरी कॅम्पच्या भर चौकात हा राडा झाला. या दोघांमध्ये फ्रीस्टाईलने हाणामारी झाली.

ही मारहाण सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र रिक्षाचालक
संतापला असल्याने भर चौकात राडा झाला. रिक्षाचा फोटो काढल्याच्या वादातून ही मारहाण करण्यात आली.

नो एन्ट्रीमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाचा वाहतूक पोलिसांनी फोटो काढला. मात्र रिक्षात पत्नी बसलेली असताना दंड आकारला जातो आहे, त्यामुळे चालकाने वाहतूक पोलिसांना उद्देशून अपशब्द वापरले.तुम्ही अशा पावत्या फाडता म्हणूनच तुमचा मृत्यू होतो.

सर्वांसमोर रिक्षाचालक असं म्हणताच वाहतूक पोलिस संतापले.याच रागातून वाहतूक पोलिसाने रिक्षा चालकावर हात उचलला.रिक्षा चालकानेही प्रतिउत्तरात हात उचलला. दोघेही एकमेकांशी भिडले.

रिक्षा चालक नशेत असल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे.असं असलं तरी वाहतूक पोलिसांना असं मारहाण करत,कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का?असा ही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here