ऑनलाइन मटका जुगार घेत असल्याने खडक पोलिसांची धडक कारवाई.
दिवसा खासगी बँकेत नोकरी अन् रात्री ऑनलाईन मटका जुगार रॅकेट चालवायचा.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
खडक पोलिसांनी केलेल्या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे,खाजगी बॅंकेत काम करणारा कर्मचारीच निघाला मटका किंग, गुरुवारी रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यासह ऑनलाइन मटका खेळणाऱ्या तब्बल १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल दिलीपसिंग परदेशी (वय ४२, रा. समर्थ अपार्टमेंट, धायरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्यासोबतच विशाल शेळके (लोहिया नगर), सुरज ज्ञानेश्वर गायकवाड (खडकमाळ आळी), मुकेश सातपुते (पानघंटी चौक), प्रतीक बनकर (झगडेवाडी), विजयसिंह बाळारामसिंग परदेशी, शिवा धनगर (पद्मावती), सुनील वाघ (सिंहगड रोड), बालाजी दत्तात्रेय गट्टे,

गणेश मारुती शेलार (सदाशिव पेठ), सचिन मधुकर सुपेकर (पर्वती दर्शन), सचिन पालवे (शिवतेज नगर), विलास दिवाने (खडकमाळ आळी), रहीम शेख उर्फ अब्दुल रहीम हजारी शेख (एमजी रोड), शुभम गोडसे, अण्णा शिंदे (बिबवेवाडी), शुभम सुरेश कापदुले (खडक माळ आळी), अक्षय सुभाष तेलवडे (कोंढवा) यांच्यासह अन्य जुगारींवर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी राहुल परदेशी हा घोरपडी पेठ येथील कै. निळू फुले जलतरण तलावाच्या मुख्य गेट समोर रस्त्यावर उभा राहून मोबाईलवर पैसे स्वीकारून ऑनलाईन मटका जुगार चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री पावणे बारा वाजता सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तो मोबाईलवर ऑनलाईन पैसे स्वीकारून मटकीच्या जुगाराचे आकड्याचे बुकिंग घेताना आढळून आला. तसेच ३९ मोबाईल क्रमांक धारक हे ऑनलाईन मटका जुगार खेळताना देखील आढळून आले. पोलिसांनी हा मोबाईल, रोख रक्कम आदी साहित्य जप्त केले आहे. सदरील कामगिरी सहा पोलिस निरीक्षक ऋतुजा जाधव, इम्रान नदाफ, आशिष चव्हाण यांनी केली आहे.




