भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात वरिष्ठांसोबतच भांडतात कनिष्ठ.
माहिती काद्याला सर्रासपणे वाटाणाच्या अक्षता
” काय ते भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, काय ते माहिती अधिकाराचे अर्ज, काय त्या अर्जाला केराची टोपली,काय ती वरिष्ठांशी हुज्जत,काय तो वरिष्ठांचा हुज्जतीवर पडदा, सगळं एकदम ओके मध्ये हाय? “
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
पुणे महानगर पालिकेतील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालये म्हणजे पुणे तिथे काय उणे? भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सर्रासपणे मनमर्जीपणा व भोंगळ कारभार चालू असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अक्षम कर्मचा-यांच्या नाकारतेपणाचा फटका सर्व सामान्यांना बसत आहे. माहिती अधिकार काद्याला १७ वर्षे पूर्ण झाली तरी आज कोणत्याही माहिती अधिकार अर्जाला उत्तर दिले जात नसून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी इतिहास बनवित आहेत.
मध्यंतरी एका समाजिक कार्यकर्ताने माहिती मागितली असताना ती न दिल्याने पुणे महानगर पालिकेच्या इमारती समोर धरणे आंदोलन केले होते. त्यामुळे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची आब्रु वेशीवर टागली गेली होती. आता पुन्हा तेच तेच माहिती अधिकारात माहिती न देण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील सिमेंट काँक्रीटीकरण व डांबरी करणांची माहिती अधिकारात माहिती मागितली असता ती विहीत मुदतीत न दिल्याने अर्जदाराने प्रथम अपील दाखल केले.सुनावणीचे पत्र निघाल्या नंतर कुंभकर्णा सारखी झोपलेले कर्मचारी जागे होत पैसे भरून माहिती घेऊन जाण्यासाठी कळविले, परंतु त्या तज्ञ लोकांना माहीत नव्हते की अपीला नंतर व विहीत मुदतीत नंतर माहिती मोफत द्यावी लागते,
अपीलाच्या दिवशी प्रथम अपील अधिकारी अस्मिता तांबे यांनी जाब विचारला असता, तत्कालीन प्रथम अपील अधिकारी तथा उप अभियंता प्रविण शिंदे यांनी प्रथम अपील अधिकारी तांबे यांना कादयाचे ज्ञान शिकवत हुज्जत घालण्यात सुरूवात केली,तांबे हे राज्य माहिती आयुक्तांकडील आदेशाबाबतीत समजूत काढत असताना तज्ञ प्रविण शिंदे हे स्वतःचाच घोडा मोठा म्हणत खोटे बोल पण रेटून बोलत होते. शेवटी तांबे यांनी १५ दिवसात माहिती देण्याचे आदेश देत आपलं नमतं म्हणत वादावर पडदा घातला.
तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा उप अभियंतांना पाठिशी कोण घालतय? त्यांच्या अश्या बेताल वागणूकीला वरिष्ठ खतपाणी का घालत आहेत. वरिष्ठांसोबतच हुज्जत घातल्याने वरिष्ठांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांना पत्रव्यवहार करून निदर्शनास का आणुन दिले नाही? माहिती अधिकार कायदा पायदळी तुडविला जात असताना कारवाई का केली जात नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
तर एक म्हण आठवली, काय ते भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, काय ते माहिती अधिकाराचे अर्ज, काय त्या अर्जाला केराची टोपली, काय ती वरिष्ठंशी हुज्जत, काय तो वरिष्ठांचा हुज्जतीवर पडदा, सगळं एकदम ओके मध्ये हाय? लवकरात लवकर कारवाईची मागणी देखील स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी केली असून पुणे सिटी टाईम्स क्षेत्रीय कार्यालयातील भोंगळ कारभार लवकरच पुणेकरांसमोर आणणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील काही तक्रार असल्यास नागरिकांनी पुणे सिटी टाईम्सशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.