पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोंड बघून कारवाई केल्याचा आरोप?
राजेश खाडे यांनी अवैध बांधकाम काढून घेण्यासाठी नियमबाह्य १५ दिवसांची दिली होती वेळ?
अशीच वेळ इतर अवैध बांधकाम करणाऱ्यांनाही देणार का❓
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुण्यातील येवलेवाडी पानसरे नगर मध्ये शेकडो कारखाने, घरांचे बांधकामे अस्तित्वात आले असताना पुणे महानगर पालिकेची कारवाई होत नसल्याने, पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन२, कडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने देखील बांधकाम विभागातील काही अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते.
अभियंता हेमंत मोरे यांच्याकडेही संपर्क साधून तक्रारी केल्या असता त्यांनी राजेश खाडे व पुंडे यांना तक्रारी नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.
मागील बातमी 👉 pune pmc | येवलेवाडी पानसरे नगर मध्ये अवैध बांधकामांचा सुळसुळाट, कारवाई मात्र शुन्यच?
राजेश खाडे यांनी सदरील ठिकाणी कारवाईसाठी तब्बल ४ महिने लावले, आणि दि. ११ जानेवारी २०२३ रोजी कारवाई करताना तोंड बघून कारवाई केल्याचा आरोप काहींनी केला आहे.
तर खाडे यांनी नोटीस बजावल्यानंतर २४ तासात कारवाई करणे पालिका कायद्या प्रमाणे बंधनकारक असताना नियमबाह्य १५ दिवसांची मोहल्लत देऊन मनमानी करून टाकली आहे.
पानसरे नगर मध्ये शेकडो अवैध बांधकामामे असताना मोजक्याच बांधकामावर कारवाई करून प्रमाणिक पणा दाखवला आहे. याचाच अर्थ कुठेतरी आर्थिक साटेलोटे झाले असावे?
अर्धवट कारवाई करून मोकळे झालेले खाडे पुढील कारवाई कधी करणार? याकडे लक्ष वेधून राहणार आहे.