पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरात वाहतूक पोलीस रोज कुठे ना कुठे वाहने अडवून कारवाई व पावत्या फाडताना दिसतच असतात, यात काहीच शंका नाही.तर कारवाईच्या वेळी पुणेकर अनेक वेळा विनवणी करून देखील वाहतूक पोलीस ऐकण्याच्या परिस्थित नसतात, त्यांना एक तर चिरीमिरी हवी किंवा दंड भरा आणि मोकळे व्हा?
परंतु दुसऱ्यावर ईमाने ऐतेबाराने कारवाई करताना स्वतःच ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचा पाहतात वाकून? अशी अवस्था आज वानवडी वाहतूक शाखेतील पोलिसांची दिसून आली आहे. गेल्या काही दिवस सलग “पुणे सिटी टाईम्सने” वानवडी वाहतूक शाखेतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला होता. तर अनेकांनी पुणे सिटी टाईम्सच्या कार्यालयात संपर्क साधून वानवडी पोलिसांबाबतीत अनेक धक्कादायक माहिती दिली आहे.
तर त्यातील एक माहिती म्हणजे सहायक पोलीस फौजदार संजय तावरे व महिला पोलिस शिपाई राणी खांदवे हया दोन्ही कारवाई करताना स्वतःच झाकून दुसऱ्यावर कारवाई करत असल्याचे पुरावे दिले आहेत.सहायक पोलीस फौजदार संजय तावरे यांची MH.12.SE.0449, ही चारचाकी स्विफ्ट कार वर ६ हजार ६०० रूपयांचे चलन (दंड) अनपेड दाखवत आहेत.
मागील बातमी 👉 वानवडी वाहतूक पोलिसांची अशीही बनवाबनवी? गाड्या अडवतात मात्र वसुली करून सोडतात?
व कारचा इंशुरन्स २१ ऑक्टोबर २०२२ रोजीच संपले आहे.तर MH.12. TN.4214 या बुलेट दुचाकीवर ५०० रूपये अनपेड चलन दाखवत आहे. आणि विषेश म्हणजे बुलेटचा इंशुरन्स २० सप्टेंबर २०१६ रोजीच संपले आहे.
तर महिला पोलिस शिपाई राणी खांदवे यांची दुचाकी क्रमांक MH.12.AL 6548 याचे इंशुरन्स १६ जून २०१७ रोजीच संपले आहे. या पुराव्यांची खातरजमा दोन तीन वाहतूक शाखेत केली असता सदरील प्रकार समोर आला असून याची पुष्टी काही अधिकृत सुत्रांनी केली आहे. दुसऱ्यांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्याच दिव्याखाली अंधार असल्याचे दिसून आले आहे. क्रमशः