सर्वे नंबर ४६/६, मौजे वडगाव शेरी, नगर रोड, टाटा गार्ड रूम,9 BRD एअर फोर्स स्टेशन समोर चालू आहे बेकायदेशीर लोखंडी ढाचा तयार करण्याच्या काम.
एअर फोर्स ची परवानगी घेणे अनिवार्य, परंतु परवानगी न घेता काम बिनधास्तपणे केलं जातयं?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे वडगाव शेरी येथील सर्वे नंबर ४६/६, मौजे वडगाव शेरी, नगर रोड १४, टाटा गार्ड रूम, 9 BRD एअर फोर्स स्टेशन समोर, बोरा गलांडे अॅसोसिएट्स यांनी पुणे महानगरपालिकेची कोणतीही अधिकृतपणे परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शेडचे बांधकाम सुरू केले आहे?. सदर बांधकामामध्ये लोखंडी पाईप आणि विविध साहित्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू असल्याचे निदर्शनास आले.
याची लेखी तक्रार एडवोकेट भाऊसाहेब रत्नाकर ढोकणे यांनी पुणे महानगर पालिका व इतर ठिकाणी केली आहे. तर एअर फोर्स विभागाच्या परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारचे बांधकाम व लोखंडी स्ट्रक्चर उभे करता येत नाही. परंतु सदरील सर्वे नंबर मध्ये नियमांची पायमल्ली करून शेड उभारले जात असल्याचा आरोप ढोकणे यांनी केला आहे.
ढोकणे पुढे म्हणाले की, महानगरपालिकेतील बांधकाम विभागाकडून आवश्यक परवानगी घेतली आहे की नाही, याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे, सदर जागा 9 BRD एअर फोर्स स्टेशनच्या कार्यक्षेत्रात,परीसात असून, त्यांच्या नियमानुसार ९०० मीटरच्या कार्यक्षेत्रात, परीसात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी संबंधित एअर फोर्स स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
त्यामुळे बोरा गलांडे असोसिएट्स यांनी सदर परवानगी घेतली आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. जर सदर परवानगी घेतली नसेल, तर हे बांधकाम सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणार आहे. सदर बांधकाम परवानगी न घेता बांधल्यामुळे ते पूर्णतः बेकायदेशीर आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे सदर बेकायदेशीर बांधकामावर त्वरित आणि कठोर कारवाई होणे नितांत गरजेचे असून सदरील लोखंडी बांधकाम पालिकेने तात्काळ जमीनदोस्त करावे अशी त्यांनी मागणी केली आहे.
एडवोकेट ढोकणे यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांची भेट घेतली असून कारवाईची मागणी केली आहे. या बाबतीत पुणे मनपा बांधकाम कनिष्ठ अभियंता भुषण कोकाटे यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, मागच्या महिन्यात चार्ज घेतला आहे. मी माहिती घेऊन कळवतो.आता पालिका बांधकाम विभागाचे अधिकारी काय भुमिका घेणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.