पुण्यातील तहसील कार्यालयाकडून मुंढवा,येरवडा, संगमवाडी,वानवडी भैरोबनआला या ठिकाणी धडक कारवाई; लाखोंचा महसूल जमा

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) अजहर खान

शासनाची परवानगी शिवाय लाखो रूपयांचा महसूल बुडवून वाळू, डबर,माती वाहतूक करणाऱ्यांना पुणे शहर तहसीलदारांनी कारवाई करून चपराक लावली आहे.वाळू, डबर, माती, खडी, वाहतूक करण्यासाठी तहसील कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

परंतु आज पुणे शहरात राजरोसपणे वाहतूक केली जात असल्याने शासनाचा रोजचचा लाखो रूपयांचा महसूल बुडवून स्वतःचे हित साधून आर्थिक फायदयासाठी शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात होता.

पुणे शहर तहसील कार्यालय ऐकशन मोड मध्ये येत मुंढवा,येरवडा, संगमवाडी, वानवडी,भैरोआला या परिसरात धडक कारवाई करून १७ वाहने जप्त करण्यात आली. वाहनांवर कारवाई करून १९ लाखांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात येत आहे.

अचानकपणे झालेल्या कारवाई मुळे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे तहसील कार्यालयातून कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here