पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुणे महानगर पालिकेने काल दि. ५ जून २०२४ रोजी कोरेगाव पार्क येथे केलेल्या कारवाई बाबतीत नवीन वाद निर्माण झाला आहे. कोरेगाव पार्क येथील फायनल प्लॉट नं ४०५ गल्ली नं ७ मधील भूखंडावर हॉटेल चूल मटण, हॉटेल बारबंका कॅफे किचन,पालमोको डाईन, ड्रिंक डान्स,पूजा फ्रुट ऍन्ड व्हेजिटेबल, लजिज चिकन सेंटर, मसल बार जिमसह क्रिकेट टर्फ हॉटेलांवर पुणे महानगर पालिकेने कारवाई करून भुईसपाट केले.
मात्र कारवाई नंतर जागा ताबा मालकाने यावर आरोप केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. उदय कोटणीस यांनी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींशी संपर्क करून सांगितले की, सदरील मिळकतीवर कोर्टाची स्टे ऑर्डर होती. सदरील ऑर्डर मध्ये नमूद होते की, जो पर्यंत खालील कोर्ट निर्णय घेत नाही तोपर्यंत जैसे थे वैसै परिस्थितीत ठेवण्याचे आदेश होते.परंतु पुणे महानगर पालिकेने कोर्टाचे आदेश धुडकावून ३ जून २०२४ रोजी नोटीस बजावून सदरील जागा मोकळी करण्याचे सांगितले.
त्या नोटीसा संदर्भात कोटणीस यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाद मागितली व सर्व कागदपत्रे दाखवली होती.परंतु पुणे महानगर पालिकेने सदरील कागदपत्रे न पाहता बळाचा वापर करून आमच्या जागेतील बांधकाम पाडून टाकले. त्यावेळी आम्ही विरोध केला असता, सीआरपीसी १४९ ची नोटीस कोरेगाव पार्क पोलिसांनी बजावली व मला पोलिस ठाण्यातच कोंडून ठेवण्यात आले.तो पर्यंत संपूर्ण बांधकाम पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाडले होते.
कोटणीस पुढे म्हणाले सदरील जागा एका बड्या बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कोर्टातून भरपाई द्यावी, कोर्टाने आदेश दिल्यास आम्ही भरपाईही देऊ? म्हणजे नागरिकांनी कष्टाने भरलेल्या कराची पालिका अधिकारी उधळपट्टी करणार का? आम्ही उद्या कोर्टात “कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट” दाखल करणार असून अधिकाऱ्यांवर कारवाईची व त्यांच्या पगारातून खर्च वसूल करण्याची मागणी करणार असल्याचे कोटणीस यांनी सांगितले आहे.
कोरेगाव पार्क पोलिस ठाणे बंदोबस्त पुरवत नसतानाही मग कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दबाव टाकला?
कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपुते यांनी आमचे सर्व कागदपत्रे पाहून उद्या कारवाई होणार नाही तुमच्याकडे कोर्ट ऑर्डर आहे. असे सांगून आम्हाला घरी पाठवलं, तर दुपारी तीन वाजेपर्यंत पोलिस ठाण्याने बंदोबस्त पुरवला नव्हता.परंतु अशी काय चकरे फिरली की, लागेचच बंदोबस्तासाठी पोलिस तैनात करण्यात आले व आम्हाला पोलिस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपुते यांच्यावर कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दबाव आणला. हे लवकरच स्पष्ट होईल तोपर्यंत पुढील कोर्टाच्या कारवाईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही सामिल करण्यात येईल.. उदय कोटणीस