पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुणे शहरातील खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पोलिस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील पोलिस कर्मचारी दारू पिऊन फुल टाईट असल्याचे दिसून आले. सदरील प्रकार हा दुपारी साडे बाराच्या सुमारास स्वारगेट पोलीस लाईन येथे घडला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सोमनाथ राजाराम शेडगे वय-४४ रा. घोरपडे पेठ, खडकमाळ आळी,यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलीस शिपाई मंगेश दिलीप कांबळे रा. स्वारगेट पोलिस लाईन,याच्यवर आयपीसी ३२४,५०४,४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वारगेट पोलीस लाईनच्या शेजारी राहण्यास आहेत.मंगळवारी त्यांच्या मित्राच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी कात्रज येथे गेले होते. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्या मित्राची दुचाकी पोलीस लाईनमध्ये पार्क करुन त्यांच्या चारचाकी गाडीतून कात्रज येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते.तेथून परत आल्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र पोलीस लाईनमध्ये दुचाकी घेण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपी मंगेश कांबळे त्याठिकाणी आला. तुम्ही कोण आहे. अशी विचारणा केली असता फिर्यादी यांनी आमची गाडी पार्क केली होती ती घेण्यासाठी आल्याचे सांगितले.त्यावेळी मंगेश कांबळे याने तुम्ही इथे थांबु नका येथुन निघून जावा असे सांगितले.
तसेच तुम्ही पोलीस लाईनमध्ये कशाला येता’ असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली.तसेच हातातील स्टीलचे ताट तोंडावर मारुन फिर्यादी यांना जखमी केले. फिर्यादी आरोपीच्या मागे पळाले असता आरोपीने घरातून रॉड आणला.मी पोलीस आहे हे तुला माहीत आहे का’ असे म्हणून फिर्यादी यांच्या पाठीवर व डोक्यात मारुन जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.