पुनित बालन यांची माणिकचंद ॲक्सेसरिक जाहिरातीवर कारवाईचे आदेश, मात्र आकाश चिन्ह निरीक्षकांचे हातवर?
” पुणे सिटी टाईम्स वॉच “
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
संपूर्ण पुणे शहरात फक्त पुनित बालन यांच्या कंपनीची जाहिरात दिसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षीची ३ कोटी २० लाखांची थकबाकी असतानाही, पुणे महानगर पालिका झोपेचे सोंग घेत आहे. पुणेकरांना यावेळी अपेक्षा होती की, कमीत कमी यावर्षी तरी शहर विद्रूप नाही होणार? परंतु पुणेकरांची अपेक्षा धुळीस मिळाली आहे.
३ कोटी २० लाख थकबाकी वसुली झाली नसताही, यावर्षी देखील पालिकेच्या नाकावर टिचून पुन्हा शहरभर बेकायदेशीरपणे जाहिराती करण्यात आली आहे. जाहिराती तर बेकायदेशीरपणे आहेच?परंतु काही गणपती मंडळांनी पुनित बालन यांच्या जाहिराती दिसण्यासाठी लावलेले बॅनरवरील हॉलिजन, तोरण हे पालिकेच्या विद्युत पोलातून वीज चोरी करत असल्याचा प्रकार पुणे सिटी टाईम्सच्या वाचकांनी निदर्शनास आणून दिला आहे.
मागील बातमी लिंक क्लिक 👉 : pmc | पुनित बालन यांचे पुणे महानगर पालिकेवर वर्चस्व.! मागच्या वर्षीची ३ कोटी २० लाख थकबाकी असतानाही पुन्हा शहरभर बेकायदेशीरपणे जाहिरात.
पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता कमीत कमी ५० ठिकाणी विद्युत पोलातून वीज चोरी करत असल्याचे पुरावे हाती आले आहे. यात गंज पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजी नगर, कुमठेकर रोड, बुधवार पेठ, सावरकर भवन समोर, पालिकेच्या विद्युत पोलातून वीज चोरी होताना दिसून आली आहे.
शहरभर फुकटात जाहिरातबाजी केली जात आहे परंतु त्यात वीज चोरी देखील केली जात असल्याने, सजग नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. पुणे महानगर पालिकेचे विद्युत विभाग झोपा काढत आहे का? मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असताना व सर्व सामान्य नागरिकांना दिसत असतानाही पालिकेला याचे गांभिर्य नसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. पालिकेच्या भोंगळ कारभारावर पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता पालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.




