भवानी पेठ क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे देखील बघून घेतेची भुमिका?
पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून अनेकदा माहिती अधिकार कायदा धाब्यावर बसविल्याचे दिसून येते. राज्य माहिती आयुक्तांनी यापूर्वी दंडात्मक कारवाई करून देखील, सदरील कायद्याला वेशीवर टांगले जात आहे. तसेच माहिती अधिकार कायद्याची अमलबजावणी होत नसल्याने आंदोलने देखील झाली. परंतु गेंड्याचे कातडीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही एक फरक पडत नसल्याचे दिसून आले आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अखत्यारीत देण्यात आलेल्या हातगाडी परवानगी व कारवाई बाबतीत माहिती अधिकारात माहिती मागण्यात आली होती.
सदरील माहितीही दर सोमवारी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे व त्याच दिवशी नागरिकांना प्रती हवी असल्यास ते लगेच पुरवणे ही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी असताना तब्बल एक महिना उलटला तरी माहिती न देता सगळ्यांनी मिळून कायदा पायदळी तुडवला आहे.
याबाबतीत अतिक्रमण निरिक्षक यांनी संपर्क केला त्यांनी कोणत्याही प्रतिसाद दिला नाही. तर तीन वेळा भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी अस्मिता तांबे धुमाळ यांना संपर्क करून सदरील माहिती दिली जात नाही. तुम्ही याबाबतीत गंभीर दखल घ्या? असे सांगून सुध्दा त्यांनी दखल न घेतल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून अतिक्रमण निरिक्षक राजू लोंढे व क्षेत्रीय अधिकारी यांच्याविरोधात राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार आहे.
भवानी पेठ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची फाईली ने आण साठी ठेकेदाराचाच माणूस का?
भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी अस्मिता तांबे यांची कार्यालयीन कामकाजाची फाईल ने आण साठी ठेकेदाराचाच माणूस नेमल्याची माहिती मिळाली आहे. ठेकेदाराच्या माणसांने कधी फाईल गहाळ केली किंवा त्यातील माहिती इतर ठिकाणी लिक केली तर त्याची जबाबदारी कोणाची? सरकारी कर्मचारी असला तर निलंबनाची व इतर कारवाई करता येईल. परंतु ठेकेदाराच्या माणसावर कोणती कारवाई होईल. असा प्रश्न आज उपस्थित होत आहे.