पुण्यातील परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांची पोलिस अधिक्षक ( ग्रामीण) म्हणून बदली. तर तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

पुणे शहरातील डॅशिंग पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांची आज बदली करण्यात आली आहे. गिल्ल हे परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त म्हणून कामकाज पाहिले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगला जनसंपर्क वाढवला होता. संदीप सिंह गिल्ल यांची बदली पोलिस अधीक्षक ( ग्रामीण) म्हणून बदली करण्यात आली आहे.

तर यापूर्वी पुण्यात काम केलेले तेजस्वी सातपुते ह्या पुन्हा पुण्यात पोलिस उपायुक्त म्हणून येणार आहे. सातपुते यांनी पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त असताना चांगले काम केले होते. पंकज देशमुख यांची पोलिस अधीक्षक ( पुणे ग्रामीण) वरून पोलिस उपायुक्त बृहन्मुंबई म्हणून बदली झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here