पब मध्ये ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवाई.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी .
पुण्यातील डेक्कन येथील एल थ्री लिक्वीड लेझर लॉन्च मध्ये अमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या प्रकरणी वरिष्ठांच्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून ज्या हद्दीतील हा प्रकार आहे, त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (गुन्हे) पोलीस निरिक्षक अनिल माने,सहायक पोलीस निरिक्षक दिनकर पाटील यांना निलंबित करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.
सर्व महाविद्यालये, पब्स, हॅाटेल्स, संशयास्पद ठिकाणं येथे त्वरीत ही शोधमोहिम कडक कारवाईसह करण्यात यावी आणि अंमली पदार्थ पुणे शहरात उपलब्ध होतात कसे? याच्या मुळाशी पोहचण्यासाठी प्रभावी तपास मोहिम सुरू करण्यात यावी, अशाही सूचना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या आहेत.