पुण्यातील भाजपाचे गणेश बिडकर यांच्या कार्यकर्त्याच्या नादी लागू नको म्हणत समर्थ पोलिस ठाण्यात २५ वर्षीय महिलेला पट्ट्याने मारहाण. ६ जणांवर गुन्हा दाखल.

0
Spread the love

 

पुण्यातील रक्षकच झाले भक्षक.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुणे शहरातील समर्थ पोलिस ठाण्यातच एका महिलेला पट्ट्याने जबरदस्त मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील पोलिस रक्षक झाले भक्षक.? महिलेला मारहाणीचा प्रकार हडपसर पोलिसानंतर आता समर्थ पोलिस ठाण्यात घडल्याने पोलिस ठाणे हे मारहाणीचे अड्डे बनलेत का? असा प्रश्न आज पुणेकरांनी उपस्थित केला आहे.

पोलिस राजकारणी लोकांच्या जीवावर जगत असल्याचे या प्रकरणातून दिसून आले आहे.याप्रकरणी २५ वर्षीय पिडीत महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात गुरुवारी १३ जून २०२४ रोजी फिर्याद दिली आहे. यावरुन पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सदाशिव दिवेकर वय-५० ,महिला पोलीस हवालदार माया तुकाराम गाडेकर, योगिता भानुदास आफळे, निलम सचिन कर्पे,एक अनोळखी महिला पोलीस शिपाई, अनोळखा पुरूष पोलीस कर्मचारी, अक्षय जीवन आवटे वय-३१ रा. सोमवार पेठ, आदित्य गौतम वय-३० रा. साततोटी गणेश मंडळ, कसबा पेठ, सुजित पुजारी रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे, यांच्यावर आयपीसी ३५४, ३५४ (ब), ३२३, ५०४, ५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय आवटे हा महिलेचा पती आहे. महिलेने पतीच्या दोन मित्रांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याचा राग मनात धरुन आरोपी पती व त्याच्या मित्रांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन धमकी दिली.

त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साहेबराव साठे यांनी ‘हिला आतमध्ये घ्या’ असे सांगितले.

त्यानंतर महिला पोलीस हवालदार माया गाडेकर, योगिता आफळे आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्यादी यांना पोलीस ठाण्यातील एका खोलीत घेऊन गेले.त्याठिकाणी महिलेचे काहीही ऐकून न घेता पाच जणांनी कंबरेच्या पट्ट्याने,लाथा बुक्क्याने व ठोशांनी मारहाण करुन जखमी केले.तसेच त्यांच्यापैकी एकाने अक्षय अवटे, आदित्य गौतम व सुजित पुजारी हे एका राजकीय पुढाऱ्याची माणसे आहेत. ते जीवे ठार मारतील असे म्हणाले.

तर सुजीत पुजारी याने याबाबत तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली. पती अक्षय याने अश्लील बोलून फिर्यादीसोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील करीत आहेत. पुणे पोलिसांची आत्मा आता युपी बिहारची गुंड पोलिसांरखी झाली आहे. आता सर्व सामान्य नागरिक पोलिस ठाण्यात मदत मागायला घाबरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here