धक्कादायक : पुण्यातील १५ लाईट वाल्यांना अल्पवयीन मुलांनी लावला चुना. तब्बल ३०० शार्पी लाईट परस्पर विकल्याचा प्रकार.

0
Spread the love

लाईट सिस्टीम व्यापारीं मध्ये खळबळ.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी .

पुणे शहरातील लाईट,शार्पी भाड्याने घेऊन ते परस्पर इंदापूर, सांगली व इतर ठिकाणी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने लाईट, सिस्टीम भाडयाने देणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सदरील हकीकत अशी की, सुजेल जाधवशुभम गायकवाड यांनी पुणे शहरातील १५ लाईट सिस्टीम चालकांकडून मोठी ऑर्डर आहे म्हणत तब्बल ३०० शार्पी लाईट भाडयाने घेतले आणि त्याचे आठ दिवसाचे भाडे देऊन विश्वास संपादन केला.

नंतर त्या ३०० शार्पी लाईट परस्पर विकून टाकले. भाडे व दिलेला माल परत मिळत नसल्याने सुजेल जाधव व शुभम गायकवाड आणि इतरांना संपर्क साधला असता ते कोणताच प्रतिसाद देत नसल्याने शेवटी येरवडा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी यंत्रणा फिरवल्याने ४० शार्पी पोलिसांच्या हाती आल्या आहेत. सदरील भामटय़ांचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here