आज सकाळी पोलिस म्हाडा मध्ये पोहचण्या पुर्वीच मुन्नाभाई चे पक्षी उडाले फुररररर.!
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे हडपसर मधील जुना म्हाडा मधील मुन्नाभाई एमबीबीएस चे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असताना पोलिसांचे सर्रासपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मुन्नाभाई एमबीबीएस च्या अवैध धंद्यांना आजूबाजूचे नागरिक वैतागले आहे.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे पुणे पोलिस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळल्या पासून पुण्यातील अवैध धंदे बंद झाले आहेत. परंतु म्हाडा मध्ये बिनधास्तपणे मुन्नाभाई एमबीबीएस चा मटका, हातभटटी दारूचे धंदे जोमाने सुरू आहे.
त्या मुन्नाभाई एमबीबीएस च्या त्रासाला आजूबाजूचे नागरिक वैतागले आहे. म्हाडा मध्ये आत बाजू पडत असल्याने पोलिसांचा लक्ष जास्त जात नसले तरी जे पोलिस आले आणि मुन्नाभाई ला नमस्कार करताच मुन्नाभाईचा त्यांना चमत्कार मिळतो. म्हणूच मुन्नाभाई व त्यांचे पंटर निर्ढावलेले आहे.
महिन्यातून एक दोन वेळा पोलिसांची रेड पडूनही अवैध धंदे अधिक जोमाने सुरू आहे.मागच्या १५-२० दिवसांपूर्वी मुन्नाभाईच्या मटकयावर पोलिसांनी छापा टाकला होता. छापा टाकून झाल्यानंतर काही तासांनी पुन्हा धंदा सुरू करण्यात आला. म्हणजे आता या लोकांना कायद्याची भिती राहिलेली नाही.
अधिकृत सुत्रांकडून माहिती घेतली असता पुणे सिटी टाईम्सने मुन्नाभाईच्या मटक्याच्या धंद्याचा व्हिडिओ काल प्रसारित केला असता, आज सकाळी पोलिसांनी छापा टाकला, परंतु छापा टाकण्या अगोदरच मुन्नाभाई चे पक्षी फुररर, म्हणून उडाले.
( पुढील बातमीत, मुन्नाभाईचे अनेक चमत्कार..!)
” मुन्नाभाई एमबीबीएस ला पोलिसांची मदत? “
म्हाडा मधील मुन्नाभाई चे अवैध धंदे जोरात सुरू असल्याने नागरिक वारंवार तक्रारी करत असतात, परंतु मुन्नाभाई एमबीबीएस चा “जलवा” पोलिसांवरही दिसत आहे. छापा टाकल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर बातमी प्रसिद्धीसाठी प्रेसनोटच काढली जात नाही. लहान मोठे भांडण झाले तर पोलिसांकडून प्रसिद्धी पत्रक काढले जाते. परंतु मुन्नाभाई च्या प्रकरणात पोलिसांची मावळ भुमिका का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.