कोंढवा शिवनेरी मध्ये चेतन लोणकरच्या बेकायदेशीर बांधकामावर पालिकेची कारवाई, ती पण तोंड बघून.

0
Spread the love

माजी नगरसेवक साईनाथ बाबरांचा बेकायदेशीर बांधकामाला अभय?

माजी नगरसेवकांच्या आशिर्वादानेच बेकायदेशीर बांधकामे फोफावली.
चेतन लोणकरच्या बांधकामावर कारवाई सुरू असताना साईनाथ बाबर यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याची सुत्रांची माहिती.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढवा खुर्द शिवनेरी नगर सर्वे नंबर ५६ /२/४/२ गल्ली नं १५ मध्ये बेकायदेशीररित्या जगताप कुंटूबियाच्या जागेत काम चालू असल्याने त्वरित कारवाई करण्यात यावी.या संदर्भात अजहर खान यांनी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याने अजहर खान यांनी पत्र देत ७ दिवसांत कारवाई झाली नाही तर लोकायुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता.

मागील बातमी : कोंढव्यातील शिवनेरी नगर मध्ये वाघमारे कुटुंबियाच्या जागेत चेतन लोणकरचे बेकायदेशीर बांधकाम.

त्याची दखल घेत पुणे महानगर पालिका बांधकाम विभाग झोन २, कडून आज कारवाई करण्यात आली. कारवाई करताना माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत चेतन लोणकरचे बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाई थांबवली?
तर पालिका कर्मचाऱ्यांनी शेजारी चालू असलेल्या बांधकामावर मोठी कारवाई केली. याचाच अर्थ साईनाथ बाबर हे तोंड बघून कारवाई थांबवतात? अशी भावना सर्व सामान्यांमध्ये झाली आहे
Video 👇
तर पुणे सिटी टाईम्स चे प्रतिनिधी सदरील ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करत असताना,चेतन लोणकर व इरफान उर्फ पाम व इतरांनी लाईव्ह बंद पाडून बघून घेण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात पुणे सिटी टाईम्स पोलिस आयुक्तांना भेटून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.

” अधिकाऱ्यांनी तोंड बघून कारवाई केल्याने संताप व्यक्त होत आहे “

पुणे महानगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायदा सर्व समान आहे.कारवाई करताना एक सारखी कारवाई करणे अपेक्षित असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तोंड बघून कारवाई केल्याने त्यांची तक्रार आयुक्तांकडे केली जाणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here