गुन्हे शाखेतील पीआय ( पोलीस निरीक्षक) शिल्पा चव्हाण यांनी केली आत्महत्या.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या.
आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.गुन्हे शाखेत नेमणुक होण्यापुर्वी चव्हाण या पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या.
गेल्या काही महिन्यांपुर्वी त्यांची गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली आहे हे मात्र अद्यापही समोर आलेले नाही.