कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, कोंढव्यात तील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकाची सोशल मिडियावर बदनामी करून त्यांच्या नातेवाईकांना व्हाट्सअप करून बदनामी केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक जवळ आल्याने आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे तर काही ठिकाणी जुन्या व्हिडिओ क्लिप बाहेर काढल्या जाऊन बदनामी केली जात आहे. असाच प्रकार कोंढव्यात घडला आहे. कोंढव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गफुर अहमद पठाण यांची व्हाट्सअप व सोशल मीडियावर बदनामी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
त्यांच्याबाबत बदनामीचा संदेश पाठवण्यात आला आहे. तसेच सभागृहातील एक क्लिप देखील व्हायरल केली आहे. पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पठाण यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अहमद युनूस सय्यद याच्यासह साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अहमद आणि त्याच्या
साथीदाराने पठाण यांच्या नातेवाईक असलेल्या एकाला व्हाट्सअपवर मॅसेज टाकला. त्यात तक्रारदार यांची बदनामी करण्यात आली होती.
त्यासोबत एक सभागृहातील व्हिडीओ क्लिप देखील प्रसारीत केली असून, हा बदनामी कारक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची बदनामी केली आहे.याप्रकरणी तक्रारदार यांनी तक्रार अर्ज केला होता. त्याची चौकशी करून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




