थर्टी फर्स्टला पुणे शहर पोलिसांकडून “डिस्को पब” बंद राहणार का?

0
Spread the love

का फक्त कोरोना व ओमायक्रोनची भिती सर्व सामान्यांना घालणार,

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी,
अजहर अहमद खान

बघतात बघता २०२१ वर्ष संपायला आले आहे परंतु कोरोना काही संपायला तयार नाही. तर त्याला मदतीसाठी ओमायक्रोन हा व्हायरस आलं की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. नविन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी आतापासूनच गर्दी दिसायला लागली आहे. नविन वर्षाच्या वेळी पुणे शहरातील पब, हुक्का पार्लर जोमाने सुरू असताना व त्याचे व्हिडिओ,फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत असतात,

शासनाने २९ डिसेंबर २०२१ रोजी नविन नियमावली जारी केली असून त्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याचे देखील सुचित करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी आजपासूनच पुणे शहरातील डिस्को-पब चालकांकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.

तर आताच पासून बुकिंग देखील घेतली जात आहे. त्यासाठी पब वाल्यांनी स्वताच्या वेबसाईटवर आणि इतर सोशल माध्यमांवर जाहिराती सुरू केल्या आहेत. ३१ डिसेंबर तारीख शुक्रवारी येत असल्याने त्यापाठोपाठ शनिवार- रविवार सुट्टीचा दिवस आल्याने या दिवसात मोठ्ठी गर्दी उसळणार यात काही शंकाच नाही.

तसेच पब मध्ये सर्व नियम धाब्यावर बसविले जात असताना पुणे शहर पोलीसांकडून कडक पावले उचलली जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यात निर्बंध असताना देखील ते निर्बंध झुगारून रेल्वे स्टेशन मागील राज बहादुर मिल येथील 2BHK पब मध्ये मोठ्ठी गर्दीची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती.

परंतु त्यावर पोलीसांनी अजूनही कारवाईचा बडगा उगारलेला नाही? कोरोना मुळे सर्वसामान्यांवर निर्बंध घातले जात असून मात्र पब चालकांना‌ अभय दिला जातो आहे? कोरेगांव पार्क १) Kynd cafe & bar, २)One restro and bar, ३)pent house, ४) local bar, ५) metro, ६) makaza ७) prems, ८) water, ९) Gravity, १०)One, ११)Oak lounge, १२) Medicy, १३)plung lounge,१४) The Liquor Garage, १५) public, १६) Penthouze, १७)hidden Place,


१८) High spirit, १९) Agent Jack, २०) Evviva Sky lounge,
२१) The cult House, २२) Brandy Boyse, २३) waters, विमान नगर, १) The mafia,२)Slay City, ३) Rude Lounge, ४) 3 Musketeers ,५) Back Stage, ६)Plann-B, ७) Social, ८) Mid Towns Bar, ९) Play Offs, १०) Shazam Zion Restaurant,

११) Talab, १२) Atmos Phere6, येरवडा, १) Unicorn Hous, २) Theka Klub Bar, ३) Elephant & company, ४) The Houze, ५) meniority, ६)Toit, ७)F.M.L, ८) Affairs Social Bar, ९) helium
-Smokies brew House, तर मुंढवा ( mundwa) १) Czar, २) Cult house, बंडगार्डन, १) 2BHK, २) kwality, ३) botanica, ४)one 8, ५) the millers, ६) the Di mora, ७) hang out, ८)masu,

९) hidden Place, १०) rooftop bar, खराडी, Fly high, Hackers, उंड्री-वानवडी, १)Betoss, २) Urban thikana, ३) Shaukeens ४)Levitate, ५) Sufi’s, ६)Club24, ७) Shesha sky lounge,

डेक्कन- कोथरूड- पौड रोड, १) 360 degree, २)Code bar, ३) Swiggin, ४) Ecstasy, ५) 3Musketters, ६) FC Road Social, ७) Thikana, ८)Culture, ९) Barberry, १०) MMyra lounge,

अश्या अनेक ठिकाणी येत्या तीन दिवस पब मध्ये धुमाकूळ घातला जाणार आहे? व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब अस्तित्वात आले आहे. याठिकाणी खरं तर येत्या तीन दिवस पोलीसांनी तळच ठोकला पाहिजे तरचं कोरोनाचे नियम पाळले जातील?आत्ताच आवर घातले नाही तर रूग्णांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही?

दोन दिवसात मंत्र्यांना कोरोना झाल्याचे वृत्त आहे. मग डिस्को पब मुळे कोरोनाची संख्या वाढली तर याला जबाबदार शासन असणार का पुणे शहर पोलीस? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर पोलीस आयुक्तांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी पुणेकरांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here