येरवडा व हडपसर परिसरात मटका अड्डयावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा,२० जणांवर कारवाई

0
Spread the love

१ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त.

हडपसर मधील दोन व येरवडा मधील एक वसुली वाल्यांमुळेच अवैध धंदे फोफावल्याची चर्चा.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील येरवडा व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असतानाही पोलिस ठाण्यातील वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदे फोफावली आहेत. त्या धंद्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीकृष्ण मंदिरा जवळ, भाटनगर येरवडा परिसरात बेकायदेशीरपणे
मुंबई मटका जुगार खेळत असलेबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीर मुंबई मटका जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे असे १० इसमांना ताब्यात घेवुन,

त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य १८ हजार ५८० किंमताचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.११ इसमांविरूध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुरनं.४६६/‌२०२२, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यांना पुढील कारवाई करीता येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यातआले आहे.

तसेच शिवशक्ती चौक, गंगानगर रोड, साईस्वरा कॉम्पलेक्सच्या बाजुला असलेल्या दुकानामध्ये गाळा नं.४ चे पडवी मधे मोकळ्या जागेत, फुरसुंगी हडपसर परिसरात बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार व पणती पाकोळी सोरट जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे १० इसम मिळुन आले.त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असे एकूण ९५ हजार ८१० रूपये किंमतीचा मुदेमाल घटना स्थळावरून जप्त करण्यात आला.

१० इसमांविरूध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुरनं १२३०/२०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन,त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सहाय्यक पोलीस अश्विनी पाटील, श्रीधर खडके, पोलीस अंमलदार, राजेद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे,अण्णा माने संदिप कोळगे, हनमंत कांबळे, अमित जमदाडे व पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली आहे.

अवैध धंदे हडपसर भागात अनेक ठिकाणी सुरू असताना वरिष्ठांचे दुर्लक्ष का? तसेच हडपसर मधील दोन चंगू मंगू मुळे अवैध धंदे फोफावली असल्याची चर्चा हडपसर भागात ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here