पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहरात जागोजागी वाहतूक कोंडी होत असताना देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस तत्पर नसल्याचे दिसून येत आहे. तर घोळक्याने, टोळी बनवून नागरिकांची दिवसाढवळ्या लूट केली जात असताना काही ठिकाणी ठोस कारवाई होताना दिसत नाही? एखाद्ये व्हिडिओ व्हायरल झाले की, मग कारवाईचा डंका पिटून मोकळे व्हायचे? पुरावे नसले की, साधी चौकशी सुध्दा होत नाही?
स्वारगेट वाहतूक विभागातील दोन पोलीस कर्मचारी नागरिकांकडून लाच स्विकारतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली, आणि मग निलंबनाचे अस्त्र बाहेर काढले गेले आहे. परंतु आजही जागोजागी वाहतूक पोलीस नागरिकांना अडवून अव्वाच्या सव्वा रुपयांची मागणी करत आहेत. परंतु त्यांना निलंबनाची भिती राहिलेली नाही.
निलंबन म्हणजे आजकाल काहिच होत नाही? कारण तेवढा आढमाप पैसा वाहतूक विभागात खेळत आहे? अवैधरित्या चालणाऱ्या रिक्षा वाहतूकीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस सपशेल फेल झाले आहे. तर त्याचे काही कारणे असे आहेत की, स्वारगेट, समर्थ, हडपसर, हांडेवाडी, वानवडी, येरवडा, बंडगार्डन, सहकारनगर, भारती विद्यापीठ, व इतर वाहतूक विभागातील वसुली बहाद्दरांची जेवणाची टाटच सोन्याची आहे?
अवैधरित्या चालणाऱ्या रिक्षा वाहतूकीला व जड वाहनांना बंदी असतानाही ती बिनधास्तपणे चालू ठेवून, त्यांच्याकडून वसुली करून अभय दिला जात असताना अशा वसुली बहाद्दरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांनी विचारला असून, पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर वसुली बहाद्दरांच्या मुसक्या आवडणार का? अशी चर्चा पुणेकरांकडू रंगली आहे.