ऑनलाईन शिधापत्रिका कराच,परंतु ऑफलाईनची सुविधा असू द्या? लोकहित फाऊंडेशन पुणेची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
नागरिकांची लूट लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढले असून आतापासूनच नागरिकांना ऑनलाईन शिधापत्रिका देण्याचे आदेश काढण्यात आले आहे. तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय उपायुक्त डॉ त्रिगुण कुलकर्णी यांनी व पुणे शहर अन्न धान्य वितरण अधिकारी दादासाहेब गीते यांनी सर्व परिमंडळ विभागाना पत्र काढले आहेत.
यापुढे आता रेशनिंग कार्यालयाच्या पायऱ्या चढण्याची नागरिकांना गरज नसली तरी, आता मात्र महा-ई-सेवा केंद्र चालकांच्या पायऱ्यांच्या चकरा वाढणार आहे. एकीकडे एंजटराज संपविण्याचा शासनाचा उददे्श असला तरी महा-ई- सेवा व सायबर कॅफे चालकांचे फावते होणार आहे. एखाद्या व्यक्ती अशिक्षित असला तरी तो परिमंडळ कार्यालयात जाऊन तेथे तो थोडेफार काम करून घेत असे, परंतु आता झोपडपट्टीने व्यापलेले अशिक्षित लोकांना संगणक हाताळता येत नसल्याने शेवटी त्यांना शासनाने नेमलेले महा-ई-सेवा केंद्र चालक एंजट हे लूट केल्याशिवाय राहणार नाही.
यापूर्वीही महा-ई-सेवा केंद्र चालकांनी रेशनिंग कार्डसाठी नागरिकांची लूट केल्याची अनेक उदाहरणे आहेत. शासनाचे वारंवार सर्व्हर डाऊन असल्याचे पुणेकरांनी अनुभवले असून, पुन्हा पुन्हा सर्व्हर डाउन झाल्यास नागरिकांना मनस्ताप नक्कीच होणार यात शंकाच नाही.
प्रत्येक परिमंडळ कार्यालयात मदत केंद्र तातडीने स्थापन करण्याची व त्यातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याची आणि तात्पुरता ऑफलाईन शिधापत्रिका देण्याची मागणी लोकहित फाउंडेशन पुणे ने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे केली आहे.