५ वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलास बिबवेवाडी पोलीसांनी ३ तासात अपहरणकर्त्यासह पकडले,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, ‌५ वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची बातमी पोलिसांनी मिळतातच पोलिसांनी यंत्रणा कामाला लावत अवघ्या ३ तासांच्या आत पोलीसांनी अपहरण कर्त्याला चिमुकल्या सहित धरले आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २ फेब्रुवारी अप्पर बिबवेवाडी येथुन ज्योती धनराज साळुंखे,पवननगर, चाळ नं. ६, शनिमंदिरा जवळ, बिबवेवाडी यांचा मुलगा ५ वर्षे हा चाळीमध्ये रस्त्यावरती मुलांसमवेत खेळत असताना त्यास आरोपी स्वप्नील रमेश शिंदे याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचेकडील दुचाकीवरून पळवून घेवुन गेल्याची माहिती ज्योती साळुंखे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात येथे तक्रार दिली.

मुलगा अपहरण झाल्याची माहिती प्राप्त होताच लागलीच बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर तसेच तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाबाबत प्राथमीक माहिती काढुन अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.

आरोपी स्वप्नील रमेश शिंदे याचे कुटूबिंय मित्र यांचेकडे कसुन चौकशी करुन, सदर भागातील सी.सी.टी.व्ही. तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे बिबवेवाडी, मार्केटयार्ड व स्वारगेट परिसरामध्ये पोलीसांच्या चार
स्वतंत्र टिम तयार करुन पुर्ण भाग पिंजुन काढण्यात आला,

काकडे वस्ती येथे अंधारामध्ये पार्क केलेली वाहने चेक करीत असताना पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस नाईक देवकते व पोलीस हवालदार देशमाने यांना एका रिक्षामध्ये आरोपी हा एका लहान मुलासह बसलेला मिळुन आला, त्याला व मुलाला ताब्यात घेवुन मुलगा सुखरुप असल्याची खात्री करुन त्यांना पोलीस ठाण्यात घेवुन आले.

आरोपीने मुलाच्या आईसोबत असलेल्या भांडणाच्या रागातुन मुलाला पळवुन नेले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सदर मुलाची आई मॉलमध्ये नोकरी करुन ती एकटीच त्या मुलाचा सांभाळ करीत आहे. आरोपी याने दुपार पासुन पाळत ठेवुन मुलास घरासमोर खेळत असताना त्यास चॉकलेट देवुन दुचाकीवरुन पळवुन नेले होते. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक काळुखे करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here