पुण्यातील पी.एस.एम. असोसिएटस प्रमोटर्स अँड बिल्डर्सने रॉयल्टी बुडवल्याने १३ लाख ९६ हजार भरण्याचे तहसिलदारांचे आदेश,

0
Spread the love

अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुरूवार पेठेत अवैध गौण खनिज उत्खनन करून रॉयल्टी बुडवल्या प्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाला पुणे शहर तहसिलदार राधिका बारटक्के यांनी १३ लाख ९२ हजार रुपये भरण्याचे आदेश काढले आहेत.

सि.टी.स.नं १६५,१६६ गुरूवार पेठ पुणे येथील मिळकती मध्ये पी.एस.एम. असोसिएटस प्रमोटर अंण्ड बिल्डर्स यांनी २१० ब्रास अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन करून त्याचे वाहतूक केल्याचा पंचनामा अहवाल तलाठ्यांनी तहसिलदारांकडे सादर केला होता.

सदरील अहवालानुसार तहसिलदारांनी ४ वेळा नोटीस काढून बाजू मांडण्याची संधी दिली होती. परंतु त्या संधीचा फायदा न घेता पी.एस.एम. असोसिएटस प्रमोटर्स अँड बिल्डर्सने कोणतेही कागदपत्रे सादर केले नाही अथवा सुनावणीला उपस्थित राहिलेले नाहीत.

तसेच तलाठी यांनी हुसेन पठाण यांना नोटीस दिली होती व त्याची प्रत कार्यालयास सादर केली होती. परंतु नोटीसाला प्रतिसाद मिळाला नसल्याने जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८ (७) नुसार १३ लाख ९६ हजार ५०० रूपयांचा दंड तहसिलदार पुणे शहर राधिका हावळ – बारटक्के यांनी ३ जानेवारी २०२२ रोजी ठोठावला आहे.

परंतु अद्यापही सदरील पी.एस.एम. असोसिएटस प्रमोटर्स अँड बिल्डर्सने दंडाची रक्कम भरली नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.तर नोटीस जैतुनबी तांबोळी व नुरबी तांबोळी यांना नोटीस बजावली आहे.

तर दंडाची रक्कम भरली नाही तर सदरील मालमत्तेवर बोजा चढविण्याचे देखील नोटीसात नमूद आहे.पी.एस.एम.असोसिएटस प्रमोटर अंण्ड बिल्डर्स यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here