कोंढवा इनाम नगर मध्ये बेकायदेशीर बांधकामांना उत, कारवाई करण्यास प्रशासनाची कुचराई!

0
Spread the love

 

हायटेशन वायर जवळ बांधकाम करता येत नसतानाही ७-८ मजल्यांचे बेकायदेशीर बांधकाम.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

पुणे शहरातील उपनगर भागातील कोंढवा मध्ये आजरोजी ७-८ मजल्यांचे बेकायदेशीरपणे बांधकाम उभी राहत असतानाही प्रशासन “ढिम्मच” बसलेले आहे. भले मोठे बेकायदेशीर बांधकाम होत असतानाही शुल्क कारवाई करून अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली असता, लगेचच पुन्हा जोमाने काम केल्याचे पुरावे आहेत.

सर्वे नंबर १५ इनाम नगर कोंढवा बुद्रुक मध्ये ९ गुंठ्यात आणि २-२ गुंठ्यात बेकायदेशीर बांधकाम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. सदरील ठिकाणी अकबर शेख, इम्तियाझ शेख, फरदीन शेख व इतर लोकांनी मिळून बेकायदेशीर बांधकाम केले आहे. बांधकामांना पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाने नोटीसा देखील बजावल्या होत्या.

तरी देखील मनपाच्या नोटीसाला केराची टोपली दाखवून सदरील बांधकाम आजरोजी देखील चालूच ठेवले आहे. या बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांवर मोफा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी जोर धरू लागली आहे. क्रमशः

” हायटेशन वायर खाली बेकायदेशीर बांधकाम आणि नागरिकांचा जीव धोक्यात? “

हायटेशन वायरखाली बांधकाम करणं कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. भारतात, विद्युत नियमांनुसार ( Indian Electricity Rules, 1956 आणि त्यातल्या सुधारणा), हायटेशन लाईन खाली बांधकाम करण्यावर कडक निर्बंध आहेत. कारण अशा ठिकाणी विजेचा धोका (इलेक्ट्रिकल हॅझर्ड) आणि जीवितहानी होण्याची शक्यता असते. परंतु बेकायदेशीर बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून येते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here