पुण्यातील ट्राफिक पोलिस निरीक्षकास महिन्याभरासाठी कंट्रोल रूमशी केले ‘संलग्न’; पोलिस आयुक्तांची कारवाई,

0
Spread the love

पुणे शहर वाहतूक विभागता उडाली खळबळ.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील ट्राफिक पोलिस निरीक्षकास महिन्याभरासाठी कंट्रोल रूमशी संलग्न केल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. माल वाहतूक करणाऱ्या पिकअप वर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना बंडगार्डन वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते.

आपल्या हाताखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण नसल्याने पोलीस खात्याची बदनामी होणारी घटना घडल्याने बंडगार्डन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ए.डी दळवी यांची नियंत्रण कक्षात महिन्याभरासाठी बदली करण्यात आली आहे.

एका ३७ वर्षाच्या पुरूषाने तक्रार दिली होती. बंडगार्डन वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार दिलीप दत्तू फुंदे याने मालवाहतूक करणारी पिकअप अडविली. त्यांच्या गाडीचा इन्शुरन्स व रजिस्ट्रेशन संपल्याचे दिसून आले. त्यामुळे फुंदे याने त्यांची गाडी अडवून ठेवली.

त्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी व RTO’ कडे ते वाहन न पाठविण्यासाठी ७ हजारांची लाच मागितली. ‘लाचलुचपत कडे आलेल्या तक्रारीची पडताळणी करताना फुंदे याने तडजोड करुन ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताना शुक्रवारी रात्री फुंदे याला सापळा रचून पकडण्यात आले होते.

दळवी यांच्या अधिपत्याखाली बंडगार्डन वाहतूक विभागात फुंदे कार्यरत होता.आपल्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे आवश्यक असताना त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याने पोलीस खात्याची बदनामी होणारी ही घटना घडली असल्याने सदरील कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here