पुणे शहरातील त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ह्यूमन ट्राफिकिंगचे गुन्हे दाखल, माहिती अधिकारात आले समोर.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT) “अजहर खान”


मानवी तस्करीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ होत आहे.जबरदस्तीने नोकर म्हणून वागवणे, वेश्या व्यवसाय, कोंडून अत्याचार, जबरदस्तीने लग्न, लहान गुन्हे, चाइल्ड पोर्नोग्राफी, भीक मागायला लावणे, अंमली पदार्थाची तस्करी, भिक मागायला लावणे, अवयव काढून घेणे आदी विविध गुन्ह्यांसाठी प्रामुख्याने मानवी तस्करी होत आहे.

संग्रहित छायाचित्र

विशेष म्हणजे वेश्या व्यवसाय, जबरदस्तीने घरात कोंडून वापर करून घेण्यासाठी परदेशी मुला-मुलींचा छळ केला जात आहे. पुण्यातील ह्यूमन ट्राफिकिंग बद्दल लेखाजोखा घेण्यासाठी पुणे सिटी टाईम्सने माहिती अधिकारात माहिती घेतली, पुण्यातील त्या पोलिस ठाण्यात सर्वाधिक मानवी तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती हाती आली आहे.

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेले फरसखाना पोलीस ठाण्यात सर्वाधिक मानवी तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

फरसखाना पोलीस ठाण्यात २०१० ते २०२१ पर्यंत १८ वर्षांखालील मुलींचे १९५ व १८ वर्षांवरील महिलांचे ४०७ गुन्हे दाखल आहेत.

संग्रहित छायाचित्र

” मानवी तस्करीचे गुन्हे दाखल असलेली पोलीस ठाणे निहाय संख्या खालील प्रमाणे ” सन २०१० ते २०२१

विश्रामबाग पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली – ० , १८ वर्षांवरील महिला- ५९,
खडक पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली- ०, १८ वर्षांवरील महिला-६,

डेक्कन पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ३, १८ वर्षांवरील महिला- ३०,

समर्थ पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली १, १८ वर्षांखालील महिला- २५,
स्वारगेट पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला-३०,

शिवाजी नगर पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली १, १८ वर्षांवरील महिला- ३५,
सहकार नगर पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली १, १८ वर्षांवरील महिला- ७०,

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ३, १८ वर्षांवरील महिला-७५,
बंडगार्डन पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली २, १८ वर्षांवरील महिला- ४१,

लष्कर पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला-६,
कोरेगाव पार्क पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली १, १८ वर्षांवरील महिला- १५९,

कोथरूड पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली २, १८ वर्षांवरील महिला- ११,
वारजे माळवाडी पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली १, १८ वर्षांवरील महिला-७,

उत्तमनगर पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला- ८,
सिंहगड रोड पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली १, १८ वर्षांवरील महिला-१७,

दत्तवाडी पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली १, १८ वर्षांवरील महिला- ७,
अलंकार पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला-६,

चंदननगर पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ७, १८ वर्षांवरील महिला- १७,
विश्रांतवाडी पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ४, १८ वर्षांवरील महिला-४,

खडकी पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली १, १८ वर्षांवरील महिला- १,
विमानतळ पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली २९, १८ वर्षांवरील महिला-५१,

येरवडा पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली २१, १८ वर्षांवरील महिला- ४३,
चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला- ६९,

हडपसर पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ७, १८ वर्षांवरील महिला-६१,
मुंढवा पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला- १०,

कोंढवा पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला- ८१,
वानवडी पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला- १६,

बिबवेवाडी पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला- १२,
मार्केटयार्ड पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला-७,

लोणीकंद पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला-१४,
लोणी काळभोर पोलीस ठाणे १८ वर्षांखालील मुली ०, १८ वर्षांवरील महिला-०,
२०११ ते आजतागायत शिक्षा झालेली व निर्दोष मुक्तता झालेल्यांची माहिती देण्यात आली नाही.

आज रस्त्यावर, सिग्नल वर भिक मागणा-यांची संख्येमध्ये वाढ झालेली आहे. भिक मागणारी लहान मुले आज आपल्या डोळ्यासमोर भिक मागत असतानाही आपण साधं प्रश्न देखील विचारू शकत नाही.

जो तो आपापल्या कामात मग्न असल्यानेच ही मानवी तस्करीची साखळी वाढत आहे. रस्त्यावर, सिग्नल वर, मस्जिद- मंदिर व इतर धार्मिक स्थळांसमोर भिक मागणा-यांची पोलीस सखोल चौकशी का करत नाहीत?

पोलिसांना अधिकार असताना त्याचा वापर का केला जात नाही? पोलिसांनी सखोल चौकशी केली तर अनेक गुन्हे उघडकीस येतील यात शंकाच नाही? मानवी तस्करीची साखळी पोलीसांनी तोडली पाहिजे,

जशी पोलीस आयुक्तांनी गुंडांची साखळी तोडली आहे तशीच मानवी तस्करी करणाऱ्यांची साखळी तोडणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आज अनेक ठिकाणी रस्त्यावर भिक मागणा-यांची संख्येत वाढ झाली आहे महिला, लहान मुले भिक मागताना दिसत आहे यात खरं तर पुणे पोलिसांना कारवाईचे अधिकार असताना त्यांच्याकडून कारवाई होत नाही.
एडवोकेट वाजेद खान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here