पुणे महानगर पालिकेचा राक्षस धावतोय रस्त्यावर, वाहतूक शाखा व आरटीओचे देखील दुर्लक्ष.

0
Spread the love

तब्बल २४- २६ वर्षे वाहनांची फिटनेस, इंशुरन्स संपल्याची धक्कादायक माहिती.

सर्व सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे वाहतूक पोलीस या वाहनांवर कारवाई का करत नाही? पुणेकरांचा संतप्त सवाल?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे महानगर पालिका पुणेकरांच्या जीवाशी खेळत असून देखील पुणे शहर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय ( आरटीओ) देखील दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे महानगर पालिकेच्या वाहनांची पासिंग, इंशुरन्स,फिटनेस संपून २६ वर्षे होऊन ही आजतागायत पालिकेचा राक्षस रस्त्यावर धावत आहे. सदरील वाहने अतिक्रमण विभागाकडून वापले जात असताना देखील पुणे शहर वाहतूक पोलिस आणि आरटीओ याकडे कानाडोळा करून पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहे.

१) एम एच.१२.डीटी.२८०२ या वाहनाची फिटनेस २०२० ला संपली असून इंशुरन्स २००७ सालीच संपले आहे. २) एम एच १२ ई क्यु ८५६१ याची फिटनेस ६ जानेवारी २०१९ रोजी संपली आहे तर इंशुरन्स मे २०२३ रोजी संपले आहे. ३) एम एच १२ ई क्यु ८५६२ याची फिटनेस एप्रिल २०१९ व इंशुरन्स ३१ मार्च २०१९ लाच संपले आहे.

पुणे महानगर पालिकेचा राक्षस धावतोय रस्त्यावर. वाहनांना २६ वर्षे होऊनही पालिका पुणेकरांचा जीव धोक्यात घालत आहे. video

४)एम एच १२ यु.ऄ.१८३७ चे फिटनेस २०२२ व इंशुरन्स ३१ ऑगस्ट २००५ लाच संपले असून सदरील वाहनाला २४ वर्षे होऊन गेली आहेत.५)तर एम एच १२ ई क्यु. ८५६० या वाहनाचे इंशुरन्स ३१ मार्च २०२० तर फिटनेस १५ जुलै २०२० रोजी संपली आहे.आणि त्याची आरसी कॅन्सल झाली आहे.

६) एम एच १२ क्यु ऐ. ७१०२ या वाहनाची फिटनेस १६ फेब्रुवारी १९९९ रोजी संपली आहे तर सदरील वाहनाला २६ वर्षे ९ महिन्यांचा कालावधी होऊन आरसी कॅन्सल झाली आहे. ७) एम एच १२ यु्.ऐ.१८३२ वाहनाचे इंशुरन्स २७ फेब्रुवारी २०१८ रोजी संपले आहे.

तर आरसी कॅन्सल झाली आहे व सदरील वाहनाला २४ वर्षे १० महिने झाल्याची माहिती पुणे सिटी टाईम्सच्या हाती आली आहे. वर्षानुवर्षे वाहने रस्यांवर धावत असताना देखील पुणे महानगर पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ विक्रम कुमार यांनी तातडीने सदरील वाहने रस्त्यावर न आणता स्क्रॅप करण्याची मागणी पुणेकरांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here