पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
कोंढव्यातील खुनाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे.दुचाकीच्या कागदपत्रांवरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.२ आरोंपीना पोलिसांनी १२ तासातच ताब्यात घेतले आहे. कोढव्यातील शिवनेरी नगर भागात काल रात्री उशिरा केबल व्यवसायिकाच्या भावाचा धारधार शस्त्राने भोकसून खून झाल्याने कोंढवा परिसरात खळबळ उडाली होती.
या खुनातील मारेकऱ्यांना पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ५ कडून १२ तासातच अटक करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे व गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-५ कडून वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोलकोटगी व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्याची उकल काही तासातच करत चोख कामगिरी बजावली आहे.
साहिल युसुफ शेख वय २३ वर्ष, रा. पिसोळी कोंढवा, २ सज्जुद्दिन उर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख, वय ३४ वर्ष, रा. सायमा सोसायटी, शिवनेरीनगर, कोंढवा ३) नोमन खान यांना गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहे.मयत बबलू उर्फ शाहनवाज मुनीर सय्यद खून प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं १२२९/ २०२३ भा.द.वी कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत बबलू उर्फ शाहनवाज मुनीर सय्यद याचेकडून संशयित आरोपी साहिल युसुफ शेख याने दीड वर्षापूर्वी पल्सर दुचाकी गाडी विकत घेतली होती. कागदपत्रांची आरोपी साहिल वारंवार मागणी मयत बबलू यांच्याकडे करत होता. परंतु बबलू त्यास नेहमी टाळाटाळ करून हीन दर्जाची वागणूक देत होता तसेच वारंवार शिवीगाळ करून अपमान करत होता. याचा राग येऊन तिघांनी मिळून बबलूचा काटा काढला.
गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन दुचाकी गाडी क्र एम एच १२.वी ई. २०२० ताब्यात घेण्यात आली आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, रामनाथ पोकळे (सह पोलीस आयुक्त-अति. कार्यभार) अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ५ गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, महेश बोळकोटगी, सहा पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, चैताली गपाट, पोलीस अमलदार रमेश साबळे, राजस शेख,प्रमोद टिळेकर,प्रताप गायकवाड, दया शेगर, विनोद शिवले, दाउत सय्यद, अमित कांबळे, अकबर शेख, पल्लवी मोरे यांनी केली आहे.