कोंढवाकरांना वाहतूकीची शिस्त नाही तर कोंढवाकरांना शिस्त लावण्याची वाहतूक पोलिसांमध्ये धमक नाही.
फळ विक्रीते, चायनिज वाले, हातगाडी वाले, यांनी रस्तेच केले हायजॅक.
फळ विक्रीते, चायनिज वाले, हातगाडी वाले, यांनी रस्तेच केले हायजॅक.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
कोंढवा मध्ये यायचे म्हणटले की, नको रे बाबा वाहतूक कोंडी पाहूनच अंगावर शहारे येतात. भले मोठी रांगच रांग लागल्याचे व रस्त्यावर अवैध रिक्षा वाहतूक, फळ, भाजी विक्रेते यांच्यामुळे वाहतूक कोंडीचा सामनाच सामान्य माणसाला करावा लागत आहे. रोजची कोंडी मुळे वाहतूकीचा कोंडमाराच झाला आहे. याला पुणे महानगर पालिका जबाबदार आहेतच आहे.परंतु वाहतूक शाखेतील वसुली बहाद्दूर पतंगे, काकडे हे देखील आहेतच?
लुलानगर च्या ब्रिज वरूनच वाहतूक कोंडी सुरू होते तर त्याहून कसे तरी पुढे आले की, मग रस्त्यावरच बेकायदेशीर थांड मांडून बसलेले भाजीपाला विक्रेते रस्ता व्यापून बसलेले आहेत. तेथे देखील जुडवा पोलिस वसुली बहाद्दूर यांची कमालची धमाल असल्याने भाजीपाला विक्रेते दिवसेंदिवस वाढतच आहे. तर ज्योती हॉटेल पर्यंत फळ विक्रेत्यांकडून रस्ते अडवले गेले आहे.
तेथून पुढे आली की मग भैरवनाथ मंदिराजवळच बेकायदेशीर रिक्षा वाहतूक ( सिट वाहतूक) करणारे पंटरांनी रिक्षा रस्त्यावरच आडवीतिडवी लावलेली असल्याने तिथे देखील पतंगेचीच वसुलीची चर्चा ऐकायला मिळते? सत्यानंद हॉस्पिटलचा पुर्ण परिसर अवैध रिक्षा वाहतूक व फळ विक्रेते, चायनिज, कपडेवाले, भाजी विक्रेते वाल्यांनी हायजॅक केले आहे.
मोर मॉल देखील हात गाडयांनी भरून वाहतूक कोंडी करत असल्याचे दिसून येत आहे. शितल पेट्रोल पंपा समोरील बाजूस देखील रस्त्यावरच बेकायदेशीर समोसा, कटलेट व इतर विक्रेत्यांचे हात गाडया लागल्याने तिथे देखील वाहतूक कोंडीचा फटका बसत असल्याने अशोका म्युझ सोसायटी पर्यंत वाहतूक कोंडीचा सामनाच कोंढवाकरांना करावा लागत आहे.
कोंढवाकरांना वाहतूकीची शिस्त नसल्याने कोंढवाकरांना शिस्त लावण्याची धमक कोंढवा वाहतूक पोलिसांमध्ये नसल्याची चर्चा कोंढवा मध्ये ऐकायला मिळत आहे.या वसुली बहाद्दूरांच्या वसुली मुळेच कोंढवाकरांचे हालच हाल होत आहे. तर अधिक माहिती घेतली असता राजकीय पक्षाच्या अंधभक्तांनीच अनधिकृतपणे टपऱ्या टाकून कोंढवा वासियांना मेटाकुटीला आणले आहे.
कोंढव्यातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांनी थांबून प्रमाणिक पणे कर्तव्य बजावत कोंढवाकरांना वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी केली जात आहे. तर वसुली बहाद्दारांचा “काला चिटटा” पुणे सिटी टाईम्स वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ विजयकुमार मगर यांच्याकडे लवकरच सादर करणार आहे. तोपर्यंत कोंढवा वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत करणार की नाही व काही बदल करणार का? याकडे लक्ष वेधून राहिल.