दुखापत करुन जबरी चोरी करणारे ४ आरोपींना केले गजाआड,मुंढवा पोलीसांची कामगिरी.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

७ मार्च २०२४ रोजी मुंढवा पोलीस ठाणे हद्दीतील शिंदेवस्ती, केशवनगर, मुंढवा, येथे फिर्यादी हे पायी चालत जात असतांना अॅटो रिक्षामधुन जाणाऱ्या चार इसमांनी फिर्यादी यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेत असतांना फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता चाकूने हातावर वार करुन जखमी करुन मोबाईल घेवून पळुन गेले असल्याने फिर्यादी यांचे तक्रारी प्रमाणे मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर कलम १०१/२०२४ भा.दं.वि. कलम ३९४, ३२४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करुन सदर घटनेची माहिती घेतली. सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेणे करीता तपास पथक, चौकी पथक अधिकारी अंमलदार यांना रवाना केले. दाखल गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असतांना दिनांक ८ मार्च २०२४ रोजी पोलीस अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झालेवरुन खात्री करुन १) सारंग ऊर्फ साऱ्या हनुमंत गायकवाड, वय १९ वर्षे, रा. सर्व्हे नं. ९४, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे २) ऋषीकेश ऊर्फ भोऱ्या गोवर्धन कांबळे वय २३ वर्षे, रा. सदर असे २ आरोपीतांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आले आहे.

तसेच पाहीजे आरोपीचा शोध घेत असता सर्व्हेलन्स विभागाचे पोलीस अंमलदार हेमंत झुरंगे यांना ९ मार्च २०२४ रोजी त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की पाहीजे आरोपी १) अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड, म्हसोबा मंदीराजवळ, सर्वोदय कॉलनी, पुणे २) हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड, वय २१ वर्षे, रा. सर्वे नंबर ५, मुंगसेआळी, केशवनगर पुणे हे पोलीस ठाणे हद्दीत आले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना दिली असता त्यांनी बातमीची खातरजमा करून, कायदेशीर ठोस कारवाई करणे बाबत सुचना दिल्या, त्याप्रमाणे नमुद आरोपीतांना अटक कारवाई करण्यात आली आहे.

अटक आरोपी यांचेकडे दाखल गुन्हयांचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता, गुन्हयाची कबुली दिली आहे.आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करतांना वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. सारंग ऊर्फ साऱ्या हनुमंत गायकवाड, वय १९ वर्षे, रा. सर्व्हे नं. ९४, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे याचे विरुद्ध दखलपात्र ७ गुन्हे, अदखलपात्र २ गुन्हे. तर ऋषीकेश ऊर्फ भोऱ्या गोवर्धन कांबळे वय २३ वर्षे, रा. सदर याचे विरुद्ध दखलपात्र ५ गुन्हे दाखल आहेत. अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड, म्हसोबा मंदीराजवळ, सर्वोदय कॉलनी, पुणे याचे विरुद्धद खलपात्र २ गुन्हे, अदखलपात्र १ गुन्हे.,हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड, वय २१ वर्षे, रा. सर्वे नंबर ५, मुंगसेआळी, केशवनगर पुणे यांचेविरुद्ध दखलपात्र १ गुन्हे.

दरची कामगिरी, पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग, यांचे सुचनांप्रमाणे,. पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ – ५,सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासोबर निकम, सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे, सहा. पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार हेमंत झुरंगे, दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, दिपक कदम, राहूल मोरे, स्वप्निल रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील व इतर टिम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here