पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहरातील कोंढवा भागात अनेक ठिकाणी अवैध बांधकामांसाठी अनधिकृतपणे शासनाचा महसूल बुडवून अवैध गौण खनिज उत्खनन करून लाखो रूपयांचा महसूल ( रॉयल्टी) बुडवून बांधकाम व्यावसायिक गलेलठ्ठ झाल्याची तक्रार अजहर खान यांनी मुंबई येथील लोक आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
त्या तक्रारीची उपलोकायुक्तांनी दखल घेत अजहर खान यांना दोन दिवसात आणखीन पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. खान यांनी तक्रारी मध्ये कोंढव्यातील एन.आय.बी.एम, मिठानगर, भाग्योदय नगर, शिवनेरी, साईबाबा नगर, पारगे नगर, येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांचा लेखा जोखा तयार केला असल्याने तहसीलदार कार्यालयात खळबळ उडाली आहे.
खान म्हणाले बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन होत असल्याची अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु त्या तक्रारींकडे तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्याने संबंधिताविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी लोक आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेण्यात आली असून दोन दिवसात सदरील अवैध बांधकाम व अनधिकृतपणे केलेले गौण खनिज उत्खननाचा लेखाजोखा देणार आहे.