पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात आत्महत्येच्या प्रकार; पुणे शहरात उडाली खळबळ

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीत चोरीच्य गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

शिवाजी उत्तम गरड असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे .ही घटना आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे. शिवाजी गरड याला वाहनचोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने त्याला १२ मे रोजी अटक केली होती.तपासानंतर त्याला काल रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.आरोपीला झोपण्यासाठी दिलेल्या चादरीचा काठ फाडून त्यांची लांब दोरी तयार केली.

सकाळी तो संडासासाठी बाथरुममध्ये गेला.तेथील जाळीला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.बराच वेळाने त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. विश्रामबाग पोलीस कोठडीच्या मुख्य पॅसेजम आतमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.मात्र,बाथरुममध्ये कॅमेरे नाहीत. असा प्रकार समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here