लाखोंचा गौण खनिज उत्खनन महसूल बुडवून उभी केली इमारत
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
कोंढवा खुर्द सर्वे नंबर ४६ कम्युनिटी सोसायटी जवळ,इमाम अबु हनिफा हॉल समोर बेकायदेशीर पणे बांधकाम सुरू असताना बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सहा सात मजली इमारत उभी राहिली आहे.
विशेष म्हणजे इमारत बांधकाम करण्यापूर्वी सदरील जागेत मोठ्या प्रमाणावर जमिन उत्खनन करण्यात आली, परंतु त्याची रॉयल्टीच भरण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.
रॉयल्टी न भरता पाया उभारणी केल्याने महसूल विभागाचा लोखों रुपयांचा महसूल बुडविला आहे. तर अवैध बांधकाम करून महानगरपालिकेचे देखील मोठे नुकसान केले आहे. कधी बेकायदेशीर बांधकाम पडले तर याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिक घेणार का? असा प्रश्न देखील स्थानिक नागरिकांनी विचाराला आहे.
बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी होत असून संबंधित बांधकाम व्यावसायिक व त्याच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.याबाबतीत अधिका-यांशी संपर्क साधला असता लवकरच कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.