आंबेगाव बुद्रूक येथील ११ अनधिकृत इमारतींवर पुणे महानगर पालिकेची कारवाई.

0
Spread the love

अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांच्या गोठ्यात उडाली खळबळ.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

जिथे तिथे अनधिकृत बांधकामांचे जाळे पसरलेले आहे. ते जाळे साफ करण्यासाठी पुणे महानगर पालिकेने सफाई मोहिम हाती घेतली आहे. आंबेगाव बुद्रुक या भागातील सिंहगड कॉलेजलगतच्या स.नं.१० पैकी मधील एकुण ११ अनधिकृत इमारतींवर बांधकाम विकास विभाग, झोन क्र.२ यांचे मार्फत २८ डिसेंबर २०२३ रोजी कारवाई करण्यात आली.

आंबेगाव बुद्रुक या भागातील सिंहगड कॉलेजलगतच्या एकुण ११ अनधिकृत इमारतींवर सुमारे ४५०५० चौ. फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली. सदर कारवाई मध्ये बांधकाम विकास विभाग, झोन क्र.२ कडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता,

व्हिडिओ बातमी }}}} आंबेगाव बुद्रुक सं नं १० येथे सहा मजली एकूण ११ इमारतींवर कारवाई करून ३५-५० हजार स्वेअर फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली..

पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेसह पोलीस पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस बंदोबस्त व पुणे मनपाचे ७ बिगारी, १ जॉ क्रशर मशिन, ३ जेसीबी, २ ब्रेकर, १गॅस कटर यांच्या सहाय्याने कारवाई करणेत आली.

सदर कारवाई मध्ये सुमारे ११ इमारतींचे एकुण ४५०५० चौ. फुटाचे पाडकाम करण्यात आले. सदर भागामध्ये वारंवार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्याने या पुढील काळात सुध्दा प्रशासना तर्फे मोठ्या प्रमाणावर व परिणामकारक कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी सदनिका विकत घेताना इमारतीस पुणे मनपाची बांधकाम परवानगी तसेच महारेरा कडे नोंदणी केल्या बाबतची खातरजमा करणेत यावी असे आवाहन पुणे महानगरपालिके तर्फे करणेत येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here