पुणे शहरात चाललंय तरी काय? दोन दिवसांपूर्वीच गणेश काळेची हत्या, अन् आज भरदिवसा बाजीराव रोडवर पुन्हा खून.

0
Spread the love

कायदा-सुव्यवस्थेचे निघाले धिंडवडे.

पुणे सिटी टाइम्स प्रतिनिधी

पुण्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचे १२ वाजले आहेत. दिवसाढवळ्या मारामाऱ्या, कोयते नाचवणे, गाड्या फोडण्याचे प्रकार वाढत असल्याने पुणेकर भितीच्या छायेखाली राहत आहेत.

दोन दिवसांपूर्वी कोंढव्यात दिवसाढवळ्या गणेश काळेची “गेम” करण्यात आली होती. त्या हत्येला अवघे २ दिवस उलटले असतानाच, गजबजलेल्या ठिकाणी आज एका १७ वर्षीय तरुणावर धारधार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मयंक खरारे (वय १७, रा. सानेगुरुजी नगर, पीएमसी कॉलनी, दांडेकर पूल, पर्वती) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर प्रकार जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोर हे दांडेकर पूल चौकातील असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here