पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
सध्या ऑटो रिक्षा चालकांचे विविध मोर्चे व आंदोलने गाजत आहेत त्यातील एक म्हणजे टू व्हीलर रॅपिडो बंद करा ही प्रमुख्याने ऑटो रिक्षा चालक संघटनाची मागणी आहे. तर रॅपिडो बंद करा व रॅपीडोचा वापर करणाऱ्या दुचाकी धारकांवर गुन्हे दाखल करा अशी प्रकारची मागणी सुद्धा होत आहे.
सर्वात प्रथम माणूस पायी चालत असे त्यानंतर तो बैलगाडी वर आला मग बैलगाडीची जागा टांगेवाल्यांनी घेतली त्यानंतर सायकल रिक्षा व सायकल रिक्षावाल्यांना ऑटो रिक्षा व इतर माध्यमेही आली. परंतु रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट,भाडे नाकारणे अशा विविध प्रकारचे तक्रारी वाढतच गेल्या, त्याचा फायदा काही कंपन्यांनी उचलला आणि त्यांनी ओला-उबेर, व इतर कंपन्या अस्तित्वात आणून प्रवाशांची गैरसोय टाळली.
त्यात आणखीन एक उडी रॅपीडो कंपनीने मारत रिक्षाचालकांना झटकाच दिला. रॅपीडो मुळे रिक्षाचालकांची पंचायत झाल्याने रिक्षा चालकांकडून आंदोलन, धरणे, तक्रारी सुरू झाल्या आहेत. परंतु टू व्हीलर रॅपडो वाल्यांचे देखील कुटुंब आहे त्यांच्याही पोट पाण्याचा प्रश्न आहे आज जवळपास ५० ते ६० हजार टू व्हीलर आपण वाल्यांचे कुटुंब देखील आहे.
व सगळ्यांना घटनेने सन्मान पोट भरण्याचा अधिकार दिलेला आहे जर लवकरच शासनाने या टू व्हीलर वाल्यांसाठी व्यवस्था नाही केल्यास लोकशाही पद्धतीने ॲड वाजेद खान यांनी लढा देण्याचे ठरवलेले आहे असे परिपत्रक प्रसिद्धीसाठी पुणे सिटी टाइम्स ला दिलेले आहे.
रिक्षाचे भाडे जास्त होत असेल तर पुणेकरांसाठी रॅपीडो एक पर्याय म्हणून का चांगले नाही?
एखाद्याला लांब जायचे असेल आणि त्याचे रिक्षा भाडे १५० रुपये होत असेल आणि त्याच ठिकाण वरून रॅपीडो अर्ध्या किमतीत नेत असेल तर रिक्षाला जास्त भाडे का द्यावे? तसेच रिक्षा चालक व त्यांच्या संघटनेनी प्रवाशांचा विचार केला असता व तर आज रिक्षा चालकांच्या डोक्यावर रॅपीडो सारखी कंपनी अस्तित्वात आलीच नसती. तरी टू व्हीलर रॅपिडो हा एक चांगला पर्याय पुणेकरांसाठी असू शकतो.
“लोकहित मोटरसायकल संघटना पुणे”