तुम्ही जाती धर्माच्या आधारे प्रचार करा, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलू.! हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, गफूर पठाण.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

मतदानाची वेळ जशी जशी जवळ येऊ लागली आहे तसा जीव पणाला लावला जात आहे. हडपसर विधानसभेत माजी आमदार चेतन तुपे व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यात चुरशीची लढाई पहायला मिळत आहे. सध्या हडपसर विधानसभेत या दोन्हींची चर्चा सर्वाधिक सुरू आहे. तर या बाबतीत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तर चेतन तुपेंचे शिलेदारांनी कंबर कसली आहे. चेतन तुपेंनी केलेल्या विकासावर सध्या निवडणूक लढवली जात आहे. तर विरोधकांकडून जातीच्या व भितीचे राजकारण केले जात असल्याचा देखील आरोप होत आहे.

चेतन तुपे पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासावर भर देत, आपल्या मोहिमेतून विकासाचा अजेंडा मांडला आहे. ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह विविध विकास कामांवर मतदारांसोबत संवाद साधत आहेत. कोंढवा परिसरात चेतन तुपे पाटील यांच्या सोबत हाजी फिरोज, रईस सुंडके,गफूर पठाण हे नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी चर्चा करत आहेत. त्यांच्या मते, मतदारसंघात रस्ते,पाणी आणि मूलभूत सोयी-सुविधा यांसारख्या विषयांवर काम करणे हीच खऱ्या अर्थाने लोकांसाठी असलेली जबाबदारी आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप हे धर्माच्या आधारावर मते मागत असल्याचा आरोप केला जातो आहे. महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी धर्माच्या नावावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप झाले आहेत. या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी धार्मिक मुद्यांवर प्रचार करताना त्यांना पाहिले गेले आहे.

या निवडणुकीत चेतन तुपे पाटील हे विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहून मतदारांच्या विश्वासाचे राजकारण करत आहेत. विकास हीच खरी ताकद असून, हडपसरच्या मतदारसंघाला पुढे नेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here