अवैध धंदे सुरू असताना सहकारनगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कसे माहित नव्हते?
अवैध धंद्यांना वसुली बहाद्दूराची परवानगी, मग धंदे जोमात.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. वरिष्ठांचे आदेश डावलून वसुली बहाद्दूराचे अवैध धंद्यांना अभय दिले जात आहे.काल धनकवडी भागातील नसरवान पेट्रोल पंपाजवळ मटका अड्डा सुरू असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत आरोपींकडून २२ हजारांची रोकड, मोबाइल संच,जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस शिपाई श्रीकांत दगडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर दहा जणांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अजय शिरसाठ वय ४८, रा. धनकवडी, किरण किसन कानकर वय ३२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी, गणेश कदम वय ३५, रा. पद्मावती, दीपक दोडे वय ५५, रा. बिबवेवाडी, दादासाहेब जोगदंड (वय ३५, रा. पद्मावती, बसू सिगली रा. मार्केट यार्ड, अर्जुन थोरात वय ४९, रा.धनकवडी, बबन कांबळे वय ५२, रा.बिबवेवाडी,
उत्तरेश्वर साठे वय ५५, रा. आंबेगाव, चंद्रकांत बाड वय ३५, रा. धनकवडी, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सदरील अवैध धंद्यांची माहिती प्राप्त होऊ शकते? मग सहकारनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठांना का नाही? का वरिष्ठांची याला मुक संमती आहे? असा प्रश्न उपस्थित होते आहे.