पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
गुन्हे शाखेतील युनिट १ येथील पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना खबर मिळाली की प्लॅटीनम बिल्डींग मंगळवार पेठ, समोरील रोडवर संशयीत लोक पेट्रोल पंपावर दरोडा घालणार आहे.तर सापळा लावून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे तयारीत असताना संशयीत आरोपी नामे १) अशोककुमार दिनेश महातु वय ३५ वर्ष,रा फुलकाहा वॉर्ड नं ११, ता कन्होळी, जि. सितामाली राज्य बिहार, २) आझादकुमार रमेशकुमार महातु वय २५ वर्ष रा मु पो ममलखा, ता घोघा जि भागलपुर, राज्य बिहार,
३) विजय गगनदेव महातु वय २९ वर्ष रा घर नं ३९/४०, गांधीनगर, गल्ली नं. १३ शांतीमोहल्ला, जुनी दिल्ली, ४) अबोधकुमार चलीतर महातु वय १९ वर्ष रा रघुनाथपुर बरारी, श्रीनगर छरापट्टी, बेगुसराय, राज्य बिहार,
५) चंदनकुमार फेनतुस महातु वय २२ वर्ष रा मुकबिरा चायटोला, जि मुगेर राज्य बिहार, ६) अनिवाशकुमार धिरेंनदर रवि वय २२ वर्ष रा बिष्णुपुर आधार, जि सितामडी,राज्य बिहार, ७) सुरेशकुमार नथुनी महातु वय २० वर्ष रा ऊत्तमनगर, नंदरामपाल, गल्ली नं. ६, नवि दिल्ली यांनापकडण्यात आले, त्यावेळी त्यांचेकडुन ८ विविध कंपनीचे मोबाईल हॅण्डसेट, कोयते चाकु, सत्तुर, मिरची पुड, नायलॉन दोरी असा एकुण ९४ हजार ७८० रूपयांचा माल मिळुन आला आहे.
त्यांचेविरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेवुन तपास केला असता त्यांनी संगनमत करुन दिल्ली हैद्राबाद पुणे मुंबई गुजरात असे रेल्वे प्रवासा दरम्याण २० मोबाईल १ लाख ७ हजारांचे चोरले आहे.
रेल्वे प्रवासा दरम्यान तसेच गर्दीचे ठिकाणी मोबाईल चोरीचे गुन्हे करणारी अंतरराज्य टोळी आहे.आरोपींनी पुणे जिल्हयासह हैद्राबाद, गुजरात, मुंबई, दिल्ली येथे मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्या अनुषंगाने आरोपींकडे तपास सुरु आहे.आरोपी विजय गगनदेव महातु व अशोक कुमार महातु यांचे विरुध्द दिल्ली व सिकंदराबात येथील पोलीस ठाणेत मोबाईल चोरी व जबरी चोरीचे असे ८ गुन्हे दाखल आहेत.
युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, राहुल मखरे,शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे,अभिनव लडकत, शुभम देसाई, निलेश साबळे, विठ्ठल साळुंखे, अजय थोरात, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर,रुक्साना नदाफ यांनी केली आहे.