नागरिकांच्या तक्रारींकडे सरासर दुर्लक्ष
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर अवैध रिक्षा प्रवासी वाहतूक सुरू असता खडक वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. तर रिक्षांवर कारवाई न करता फक्त दुचाकींवर कारवाई करून दुजा भाव केला जात आहे.
गोटीराम भैय्या चौक, प्यासा हॉटेल शेजारी रिक्षा मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी खडक वाहतूक पोलिसांची गराडा घालून कारवाई चालू असते, त्यात एक पीएसआय,अंमलदार व कर्मचारी कारवाई करताना दिसत असतात,
परंतु त्यांच्या डोळ्यासमोर अवैध रिक्षा वाहतूक सुरू असताना कारवाई होत नसल्याने दुचाकी स्वार नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पुणे सिटी टाईम्स काढलेल्या फोटोत रिक्षा मध्ये मागे चार व ड्रायव्हरच्या आजूबाजूला दोन असे प्रवासी प्रवास करताना दिसून आले आहे.
एखादे अपघात झाले तर याची जबाबदारी खडक वाहतूक पोलिस घेणार का?खडक वाहतूक पोलिसांकडून कारवाई का केली जात नाही? रिक्षा चालकांसोबत साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.