नाना पेठ, भवानी पेठ, मुंढवा, घोरपडी, गुलटेकडी, परिसरातील नागरिकांचा विरोध.
पुणे सिटी टाईम्स : अजहर खान
पुणे शहरातील ३ रेशनिंग कार्यालय ( परिमंडळ विभाग) पुढच्या महिन्यात स्थलांतर होणार आहे. शिवाजी नगर कोर्ट समोरील क ” ल ” कार्यालय हे शिवाजी नगर येथील साखर संकुल येथे हलविण्यात येणार आहे. शिवाजी नगर भागातील व क” ल” विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरातील नागरिकांना ते सोईस्करच असणार आहे.
परंतु ब” परिमंडळ कार्यालय हे सध्या पुणे रेल्वे स्थानकाजवळ, असलेल्या पीएमटी इमारत मध्ये आहे. परंतु ती इमारत सुरक्षेतेच्या कारणास्तव रिकामी केली जाणार आहे. ब” परिमंडळ कार्यालय हे नागरिकांना सोईस्कर व जवळ होईल आणि परिसरातच राहिल अशी व्यवस्था अन्न धान्य वितरण कार्यालयाने करणे अपेक्षित असताना, सदरील ब” परिमंडळ कार्यालय हे शिवाजी नगर येथील साखर संकुल येथे हलविण्यात येणार असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
काही ना काही कारणाने नागरिकांना रेशनिंग कार्यालयाची पायरी चढावीच लागते. तर ब” परिमंडळ कार्यालय मध्ये नाना पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, काशेवाडी, कॅम्प, मुंढवा, घोरपडी गाव, व इतर परिसरातील भाग येतो.
आता कार्यालय स्थलांतरित केल्यास शिवाजी नगर साखर संकुल येथे नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे. रेल्वे स्थानकाजवळ असल्याने नागरिकांना ते जवळ होते. परंतु आता शिवाजी नगर येथे गेल्याने नागरिकांचा वेळ, इंधन खर्च वाढणार आहे. त्यात अधिकारी जागेवर नसल्यास नागरिकांना चपला घासाव्या लागणार यात शंकाच नाही. म्हणून या ब” परिमंडळ कार्यालयाला शिवाजी नगर येथे न हलविता जवळ पासच स्थलांतर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.