मुंबई कुर्ला अपघातानंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे शहर वाहतूक शाखा, पुणे महानगर पालिकेच्या बसेस व कचरा डंपर वाहनांची तपासणी करुन गुन्हा दाखल करणार का❓

0
Spread the love

पुणे महानगर पालिकेची अवजड वाहने झाली राक्षस?

पुणे सिटी टाईम्स; अजहर खान

मुंबई कुर्ल्यामध्ये भिषण अपघात झाला व त्यानंतर अपघात पाहून प्रथमदर्शनी पाहणाऱ्या नागरिकांच्या अंगावर शहारेच आले, अपघात ऐवढा भिषण होता की, जाग्यावर रक्तच रक्त दिसत होते. आज आमच्या पुणे शहरात देखील, बिनदिक्कतपणे अवजड वाहने रस्त्यावर पाहायला मिळतात. त्यात विषेश म्हणजे काही पाण्याचे टॅंकर, डंपर, डिपर, कंटेनर, रोड मिक्सर, ट्रॅक्टर आणि पुणे महानगर पालिकेच्या बसेस व कचरा गाड्या विना फिटनेस रस्त्यावर धावत असतात? याची स्वतः कधी पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्तांनी रस्त्यावर उतरून पाहणी केली आहे का?

तसेच पुणे महानगर पालिका आयुक्त व पीएमपीएमएल अधिकारी पाहणी केली आहे का? नाहीच केली असणार? यांना पुणेकरांच्या जिवाशी काहीच देणेघेणे नाही. रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात परंतु लोक मरतायेत आपल काय जातंय? आपला बाब्या दुसऱ्यांच कर्ट, अशी गत झाली आहे?

आज पुणे महानगर पालिकेची कचरा वाहून नेणारे डंपर अनफिटनेस व मुदत संपलेली वाहने ” राक्षस “ प्रमाणे धावत आहे. हे वाहने तपासणी कधी वाहतूक पोलिसांकडून सक्तीने तपासणी होताना दिसून येत नाही.

वाहतूक पोलीस फक्त दुचाकी व कार यांच्यावरच इमानदारीने कारवाई करताना दिसत आहे. हीच कारवाई इमानदारीने पालिकेच्या अनफिट वाहनांवर केली तर पुण्यात संतोष माने पुनरावृत्ती होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here