ह” परिमंडळाच्या भागात आनंदाचा शिधा अपहार झाल्याचे वृत्तांकन, परंतु अन्न धान्य वितरण कार्यालया मार्फत कळविण्यात आले असे काही झालेच नाही?
मग वृत्तपत्रात आलेली बातमी खोटी की FDO कडील पत्राचे उत्तर खोटे.
ह” परिमंडळ अधिकारी अमोल हाडेला पाठीशी का घातले जात आहे.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
मागच्या वर्षी शासनाने नागरिकांसाठी गौरी गणपतीच्या दरम्यान आनंदाचा शिधा आणला होता.तो शिधा पुणे शहरातील ११ परिमंडळ कार्यालयात वाटप करण्यात आला.परंतु ह” परिमंडळ कार्यालयातील काही दुकानदारांकडे हा आनंदाचा शिधा पोहचलाच नसल्याचे अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी मोठा वादंग निर्माण झाला होता.
तर पत्रकारांना माहिती देताना अन्न धान्य वितरण अधिकारी ( अतिरिक्त) प्रशांत खताळ यांनी सांगितले होते की, आनंदाचा शिधा वाटप करताना काही ठिकाणी गहाळ झाला. पर्वती भागातील एका रेशन दुकानात डाळ आणि तेल मिळाले आणि दुसऱ्या दुकानात साखर, रवा, तेल आणि डाळ मिळाली नव्हती हे अन्नधान्य खुल्या बाजारातून खरेदी करून रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे.
याप्रकरणी ह” परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांची चौकशी करणे आवश्यक असताना अश्या कोणत्याही प्रकारची कारवाई नसल्याचे समोर आले. तर अजहर खान यांनी अन्न धान्य वितरण अधिकारी ( अतिरिक्त) तथा जनमाहिती अधिकारी यांना सदरील आनंदाचा शिधा किती टन/ पाकिटे गहाळ झाली व त्या संदर्भात वरिष्ठांना केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत मागितली होती. तर आनंदाचा शिधा गहाळ झाल्या बाबतीत जबाबदारी कोणावर निश्चित करण्यात आली त्याबद्दल कागदपत्रांची प्रत व आनंदाचा शिधा गहाळ झाल्यानंतर खाजगी विक्रेत्यांकडून धान्य खरेदी करण्यात आले तो दुकानदार, ठेकेदार कोण आहे याची माहिती तसेच या खरेदीसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री किंवा पुणे जिल्हाधिकारी यांची लेखी परवानगी घेतल्याची प्रत मागितली होती. आणि तसेच खाजगी विक्रेत्यांकडून धान्य खरेदी करताना खरेदीसाठी रक्कम कोणी दिली त्या बँक स्टेटमेंट ची प्रत मागितली होती.
अन्न धान्य वितरण अधिकारी ( अतिरिक्त कार्यभार) प्रशांत खताळ यांनी माहिती अधिकारात उत्तर देताना म्हणाले गौरी गणपती निमित्त आनंदाचा शिधा गहाळ झाला नसून तो रास्त भाव दुकानदारास उशिरा पोहच झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी विचारण्यात आलेल्या पत्रव्यवहाराची कोणती माहिती या कार्यालयात उपलब्ध नाही तसेच मुद्दा दोन, तीन, चार, पाच, सहा बाबतची माहिती निरंक आहे.
म्हणजे यात खरं कोण बोलतोय आणि खोटं कोण बोलत आहे हे स्पष्ट दिसत आहे. म्हणजे पत्रकारांना खोटी माहिती द्यायची आणि कोणी माहिती अधिकारातून प्रश्न विचारले तर खोटं उत्तर देऊन मोकळे व्हायचे? खोटं बोल पण रेटून बोल असे सध्या अन्न धान्य वितरण कार्यालयात चालू आहे. क्रमशः
” उपायुक्त पुरवठा अधिकारी हे देखील झोपेचे सोंग घेऊन बसलेत? “
ज्या दिवशी सर्व वृत्तपत्रांमध्ये आनंदाच्या शिधाची बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यानंतर अजहर खान यांनी लगेच ३० डिसेंबर २०२४ रोजी तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे व उपायुक्त पुरवठा यांना पत्र पाठवून तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्या अनुषंगाने उपायुक्त पुरवठा ( अति) महेश सुधळकर यांनी अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यात नमूद केले होते की, पुणे शहरातील रेशनिंग कार्यालयातून नागरिकांना आनंदाचा शिधा मिळत नसल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने सदर विषयाबाबत वास्तुस्थितीचा सविस्तर अहवाल तात्काळ या कार्यालयास व शासनास सादर करण्यात यावा. सदर बाब ही अत्यंत खेदजनक व गंभीर स्वरूपाची आहे. सदर कामी विलंब टाळावा अन्यथा सर्वस्वी जबाबदारी आपले कार्यालयाची राहील याची गांभीर्य नोंद घ्यावी. परंतु ३१ डिसेंबर २०२४ ते आजतागायत म्हणजे ७ महिन्यांचा कालावधी होत आला तरी कारवाई झाली नसल्याने अजहर खान यांनी पुन्हा पाठपुरावा केल्याने उपायुक्त पुरवठा विभागाने पुन्हा पत्र काढून खुलासा मागितला आहे. म्हणजे उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा काम उपायुक्त पुरवठा विभाग करत आहेत. या कागदी घोड्याने काय होणार हे वेळच ठरवेल.




