पुण्यातील महंमदवाडी येथे बीजीएस ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा घालणाऱ्या ७ दरोडेखोरांना अटक,५० लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुण्यातील महंमदवाडी येथील वाडकर मळ्या शेजारी असलेल्या बीजीएस ज्वेलर्सवर दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने खळबळ उडाली होती. भरदिवसा सोन्याच्या दुकानावर दरोडा पडल्याने पोलिस ही चक्रावून गेले होते.पोलिसांनी त्यांची चक्रे फिरवून अखेर चोवीस तासांच्या आत दरोडेखोरांना अटक केली आहे.गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी नॉनस्टॉप कारवाईचे सूत्रे हातात घेत आरोपींची धरपकड केली आहे.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्यासह, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,अजय वाघमारे, उल्हास कदम, क्रांतीकुमार पाटील,यांनी दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, काल १८ मे २०२४ रोजी सकाळी १२ वा. च्या सुमारास महंमदवाडी रोड, वाडकर मळा येथील शफीउद्दीन शेख यांच्या बीजेएस या सराफा पेढीवर ६ ते ८ दरोडेखोरांनी बंदुकीसह दरोडा टाकून ५०० ग्राम सोने चोरले होते. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१) सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे, वय २० वर्षे, रा. ए.आर.ए. आय.रोड, वसंतनगर, खडेकश्वर मित्र मंडळाजवळ, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड, २) सनी ऊर्फ आदित्य राजु गाडे, वय १९ वर्षे रा. सदर ३) पियुष कल्पेश केदारी, वय १८ वर्षे, रा. स.नं. १०३, जयप्रकाश नगर, माऊली चौक, डॉन बॉस्को हायस्कुल समोर, येरवडा, ४) ओमकार ऊर्फ ओम्या जगन वाल्हेकर, वय १९ वर्षे, रा. जयभवानीनगर, कोथरुड,

५) नारायण ऊर्फ नारु बाळु गवळी, वय २० वर्षे, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कोंढवा रोड, कात्रज, ६) मयुर चुन्नीलाल पटेल, वय ५३ वर्षे, रा. स.नं. १४, प्लॉट नं. ६, लोकरे बिल्डींग, फ्लॅट नं. १, कामधेनु पार्क शेजारी, वानवडी, ७) नासिर मेहमुद शेख, वय ३२ वर्षे, रा. घर नं. ३१६, चांभारवाडूर वानवडी, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here