पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढव्यातील बेकायदेशीर बांधकाम वाढता वाढता वाढत असल्याने पुणे महानगर पालिका बांधकाम विभागाची डोकेदुखी वाढली आहे. बेकायदेशीर बांधकाम करून पालिकेच्या तिजोरी खाली करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

बेकायदेशीर बांधकाम संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने पालिकेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. काल दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी सहा ठिकाणी चालू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर होल मारण्याची कारवाई करण्यात आली आहे.

मिठानगर लेन नं ५ जवळील राजीव गांधी शाळे शेजारी चालू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर पालिकेकडून होल मारण्याची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे सिटी टाईम्सने काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई कधी होणार? याची बातमी प्रसिद्धी केली होती. त्या बातमीची दखल घेऊन पालिका बांधकाम विभागाने हातोडा चालवला आहे.

पालिकेने काल केलेल्या कारवाईत ४२ हजार स्क्वेअर फिट बांधकामांवर कारवाई केली आहे. सदरील कारवाई मिठानगर, भाग्योदय नगर, शिवनेरी नगर व इतर ठिकाणी कारवाई केली आहे. नवनाथ माने, अजमल अन्सारी, आझाद खान, साबीर शेख, हारून मणियार यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.


” पालिके तर्फे कोंढवाकरांना आव्हान “
बेकायदेशीर बांधकाम करू नये, बांधकाम करण्यापूर्वी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी न घेता बांधकाम केल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल, तसेच नागरिकांनी बेकायदेशीर बांधकामांमध्ये फ्लॅट खरेदी करू नये असे आव्हान बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेश खाडे यांनी केले आहे.



