पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, १३ वर्षे ९ महिन्याची शालनी घरातून बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील प्रकरणी शालनीचे वडील अगर दौलत राठोड वय ३३ वर्षे, रा.आंबळे रेल्वे स्टेशनचवळ टेकवडी ता. पुरंदर जि.पुणे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालनी ही हॉलमध्येच झोपली होती, त्याच्या वडिलांनी झोपतुन उठुन बेडरूमधुन हॉलमध्ये आले असता शालनी ही हॉलमध्ये झोपलेली दिसून आली नाही.
दरवाजा उघडण्यासाठी आले तेव्हा दरवाज्याला बाहेरून कडी होती. फिर्यादी यांचे बाहेर झोपलेले आई-वडील यांना खिडकीतुन आवज दिला त्यांनी दरवाजा उघडला त्यांना शालनी ही बाहेर आली आहे का, असे विचारले असता त्यांनाही त्या बाबतीत काहीच माहित नव्हते,आजुबाजूला असणारे नातेवाईक यांचेकडे मुलगीहीचा शोध घेतला परंतु मुलगी ही कोठेही मिळुन आली नाही.
चाकण नानेकर वाडी येथे असणारा त्यांचा चुलत मेव्हणा अक्षय जयरसिंग ठाकुर यांस झालेला प्राकर सांगीतला असता त्यांने ही त्यांचा मुलगा राजु हा रात्री पासुन घरी आला नाही असे सांगीतले,
शालनी ही राजु अक्षय ठाकुर याने पळवुन नेल्याचा संशय आल्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शालनी बद्दल अधिक माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहान शालनी चया वडिलांनी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींना सांगितले आहे.




